Tuesday, May 26, 2020

NPCI launches AI virtual assistant PAi


26/5/2020

PUNE: National Payment Corporation of India (NPCI) said that it has launched an artificial intelligence (AI) based chatbot, PAi, to create awareness around its products like FASTag, RuPay, UPI, AePS on a real time basis. This is yet another NPCI’s initiative to improve digital financial inclusion in India. 

The AI virtual assistant, PAi is available round the clock helping users with access to accurate information on NPCI products. Customers can ask their queries in English and Hindi, via text or voice on the websites of NPCI, RuPay, and UPI Chalega. Through PAi, users get verified automated responses to their queries on all NPCI’s products. PAi would also be accessible to global RuPay Cardholders as well. 

Kunal Kalawatia, Chief of Marketing, NPCI said, “We are glad to unveil AI-powered Pai for our users. In this fast paced world, addressing user queries is the need of the hour. We believe PAi will create entirely new user experiences that are as natural and easy as conversations, help users know about our products and in-turn promote digital payments.”

PAi is developed by Bengaluru based startup CoRover Private Limited whose AI/ML powered NLP chatbot technology has been accessed by 20 Crore+ consumers. 

Ankush Sabharwal, Founder & CEO, CoRover said, “As the world changes, Conversational AI will be the core for business continuity and its seamless operations. Chatbots powered by conversational AI brings every customer closer to verified information on their digital payments. CoRover is excited to partner with NPCI and contribute to the vision of building robust digital payment infrastructure for India and the world.”

To help increase the adoption of digital payments among Indian citizens, PAi will soon be available in several regional languages of India.

Sunday, May 24, 2020

पॅडी आर्टने शेतात साकारले सरसेनापती हंबीररावचे पोस्टर


कोरोनाच फटका आज सर्वच क्षेत्राला बसला आहे. शेतकरीसुद्धा यातून सुटलेला नाही. लॉकडाऊनच्या काळात वेळेचा सदुपयोग करून काहीतरी वेगळे करुयात या विचाराने प्रेरीत झालेल्या एका  युवा शेतकऱ्याने वेगळी  वाट चोखाळत भारतात फारसे प्रचलित नसलेल्या ‘पॅडी आर्ट’च्या माध्यमातून आगामी प्रविण विठ्ठल तरडेलिखित, दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य, ऐतिहासिक मराठी चित्रपटाचे पोस्टर गव्हाच्या शेतात साकारले आहे.

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात पिंपळगाव या ठिकाणी 90 बाय 45 फुट एवढ्या मोठ्या आकाराची कलाकृती साकारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श, प्रेरणा मानणारे युवा शेतकरी अभयसिंह आडसुळ यांच्या संकल्पनेतून तेथील जिल्हा परिषद शाळेत कलाशिक्षक असलेल्या कुंडलीक राक्षे, तसेच शिवप्रेमी अक्षय पोते यांनी या पोस्टरला 20 दिवसांच्या परिश्रमातून मूर्त स्वरूप दिले आहे.

लॉकडाऊन, कोरोनाचा प्रादुर्भाव अशा संकटकालात एक सकारात्मक विचार करून एका युवा शेतकऱ्याने, कलाशिक्षकाने साकारलेले हे पॅडी आर्ट सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार हे नक्की. ही कलाकृती बघितल्यानंतर प्रविण तरडे यांनी आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवर लिहिले आहे की, अभयसिंह अडसूळ या शेतकरीमित्राच्या संकल्पनेतून कुंडलिक राक्षे या शेतकऱ्याने गव्हाची अशी शेती केली. याला बहुदा ग्रास आर्ट म्हणतात. कुंडलिक मी तुला ओळखत नाही पण माझा शब्द आहे तुला, तुझ्या या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार.’’

रुद्राक्ष बँडचे गझल रॉक हे नवे गाणे प्रदर्शित


सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साई पियूष ह्यांच्या बँड रुद्राक्ष ला नुकतीच  दहा वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने त्यांनी गझल रॉक नावाचे नवे गाणे Zee Music Co कडून रिलीज केले, लॉक डाऊन मुळे नवीन कलाकृतींची निर्मिती होत नसल्याने रसिकांसाठी ही एक पर्वणीच आहे,

नुकतेच हे गाणे सोशल मीडिया च्या माध्यमातून रासिंकासमोर आले असून साई पियूष यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे गौरव बुरसे यांनी गायले आहे, या गाण्यासाठी हार्मोनिअम पियूष कुलकर्णीड्रम्स साईप्रसाद निंबाळकर, गिटार आशिष जाधव यांची साथ लाभली असून, या गाण्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Song Link -