Friday, February 14, 2020

डॉ. धारिया यांच्या जयंतीनिमित्त स्मृती विशेषांकाचे प्रकाशन

पुणे: ‘पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या ९५ व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला आणि राष्ट्राप्रतीच्या त्यांच्या बहुमोल योगदानाला समर्पित ‘वनराई’विशेषांकाचे प्रकाशन त्यांच्या जयंती निमित्त करण्यात आले.  या अंकाचे प्रकाशन यावेळी  अनिल गुंजाळ उपायुक्त (परीक्षा परिषद), महाराष्ट् शासन, माजी आमदार उल्हासदादा पवार, डॉ. चंद्रकांत पांडव, अशोक गोडसे (अध्यक्ष श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळ), वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया, रोहिदास मोरे यांच्या हस्ते झाले.

खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभेचे खासदार कुमार केतकर, ‘युवक बिरादरीचे संस्थापक व पद्मश्री पुरस्कारप्राप्त क्रांती शाह, ‘इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट एज्युकेशन’चे संचालक डॉ. प्र. चिं. शेजवलकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, जेष्ठ पत्रकार अरुण खोरे आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी ‘पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया स्मृती विशेषांका’तून अण्णांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे.

आण्णांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘वनराई पर्यावरण वाहिनी’च्या माध्यमातून निबंध स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये दोन हजार विद्यार्थ्यां

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनराईचे विश्वस्त रोहिदास मोरे, सुत्रसंचालन वनराई पर्यावरण वाहिनी प्रकल्प संचालक भारत साबळे यांनी केले तर आभार अमित वाडेकर यांनी मानले. यावेळी वनराईचे प्रभारी सचिव चंद्रकांत इंगुळकर, प्रमुख प्रकल्प संचालक श्री. जयवंत देशमुख, वृशाली नामपूरकर आणि वनराईचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

वनराईच्या पर्यावरण वाहिनीच्या पुरस्काराचे वितरण

शालेय विद्यार्थ्यांवर पर्यावरणाचे संस्कार व्हावेत यासाठी वनराई पर्यावरण वाहिनीच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कलागुणांना, विचारांना, नवीन उपक्रमांना वाव देण्यासाठी वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निबंध, चित्रकला, सांस्कृतिक, गुरुबाग, टाकाऊपासून टिकाऊ, प्लास्टिक कचरा मुक्त अभियान अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. अण्णांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून या स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. निबंध व चित्रकला स्पर्धेतील १२० विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली गेली. विद्यार्थ्यांवर पर्यावरणीय संस्कार करणाऱ्या १० शिक्षकांना ‘वसुंधरा रक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच पर्यावरण क्षेत्रात शाळेत व शाळेबाहेरही उत्कृष्ट काम करणाऱ्या ५ शाळांना ‘उत्कृष्ट पर्यावरणप्रेमी शाळा’ म्हणून गौरविण्यात आले.

नी सहभाग घेतला होता. तर चित्रकला स्पर्धेत ४७०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. ‘गुरुबाग’ स्पर्धा म्हणजे मातीविना शेती स्पर्धेत २० शाळांनी भाग घेतला होता. या सर्व स्पर्धांमधून पर्यावरण पूरक पिढी घडविण्याचे आण्णांचे स्वप्न साकार करत असल्याची भावना वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया यांनी व्यक्त केली.
यामध्ये प्रथम क्रमांक मॉडर्न हायस्कूल गणेशखिंड,पुणे., द्वितीय क्रमांक - भेकराई माता माध्यमिक विद्यालय, भेकराई नगर, पुणे., तृतिय क्रमांक -  समाजभूषण बाबुराव फुले विद्यालय,पर्वती., चतुर्थ क्रमांक - विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक स्कूल,पुणे, क्रमांक पाच - विद्यापीठ हायस्कूल, गणेशखिंड,पुणे,  होत्या. याबरोबर उस्मानाबद येथील १५ शाळांनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. बक्षीसपात्र विद्यार्थी व शाळांना वनराई करंडक, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. हा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्र सेवा दल कार्यालय, सिंहगड रोड येथील निळू फुले सभागृहामध्ये झाला.

1 comments:

  1. If your gut is informing you that something simply isn't ideal then possibly you do require looking into some bodies past, It's constantly clever to understand precisely who you are handling particularly when it concerns an individual manatee county mugshots that you are either near to or perhaps somebody who has routine contact with among your kids.

    ReplyDelete