Friday, February 14, 2020

कृष्णांजलीद्वारे मीराबाईंच्या रचना ऐकण्याची संधी

पुणे : कृष्णभक्तिच्या अनेक संतरचना, भक्तीगीतं  रसिकांनी आजवर ऐकलेली आहेतच. मधुराभक्ती व भक्तिरसाशी नातं सांगणाऱ्या संत मीराबाईंच्या रचनांचे स्थान हे उच्च, उत्तुंग व अद्वितीय असेच आहे. 'कृष्णांजली' या कार्यक्रमाद्वारे संत मीराबाईंच्या रचना रसिकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.

या रचना सादर करणार आहेत प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या लोकप्रिय युवा गायिका शरयू दाते, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, राधिका ताम्हनकर, सावनी शेंडे-साठ्ये तसेच ज्येष्ठ गायक आणि

युवा पिढीसाठी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताचे जगभर प्रसाराचे काम करणाऱ्या 'रागा नेक्स्ट'ने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून हा कार्यकम गुरुवार, दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पंडित हेमंत पेंडसे यांनी आज (दि. १३) पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आर्या आंबेकर, राधिका ताम्हनकर उपस्थित होत्या.

पं. हेमंत पेंडसे यांनी संगीतबद्ध केलेल्या मीराबाईंच्या रचना रागा नेक्स्ट या कंपनीने ध्वनीमुद्रीत करुन प्रकाशित केल्या आहेत. त्यांच्याच वतीने खास पुणेकर रसिकांसाठी या अल्बममधील गाण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या रचना ऑडीओ रेकॉर्डींग स्वरुपात 'रागा नेक्स्ट'च्या साईटवरुन ऐकायला मिळणार आहेतच पण प्रत्यक्ष लाईव्ह कार्यक्रमाद्वारे ऐकण्यासाठी संधी पुणेकर रसिकांसाठी 'रागा नेक्स्ट'चे अरुण जोशी यांनी उपलब्ध करुन दिली आहे.

प्रसिद्ध हार्मोनियम नरेंद्र भिडे यांनी संगीत संयोजन केले असून राजेंद्र दूरकर (साईड र्‍हिदम), केदार परांजपे (की बोर्ड), विक्रम भट (तबला), रोहित वनकर (बासरी), गोविंद भिलारे (पखवाज), अभिषेक बोरकर (सरोद) हे साथसंगत करणार असून कार्यक्रमाचे निवेदन डॉ. मानसी अरकडी करणार आहेत.

रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून प्रवेशिका दि. १५ फेब्रुवारीपासून नावडीकर म्युझिकल्स कोथरूड, पुणे येथे सकाळी ११ ते १ व सायंकाळी ५ ते ८ या वेळात व टिळक स्मारक मंदीर येथे सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ५ ते ८ या वेळात मिळतील.
संगीतकार पंडित हेमंत पेंडसे.

दर्जेदार चालींच्या रचनांनाचे रसिक नक्कीच स्वागत कराल अशी खात्री असून रसिकांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन 'रागा नेक्स्ट'चे अरुण जोशी यांनी केले आहे.

0 comments:

Post a Comment