Saturday, January 18, 2020

सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सव- २०२०


पुणे - दरवर्षी जानेवारी महिन्यात सिंबायोसिसतर्फे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाचे यंदाचे हे २६ वे वर्ष आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये नामवंत कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या महोत्सवाचे उदघाटन गुरुवार, दिनांक २३ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी :३० वाजता जितेंद्र जयाप्रदा यांच्या हस्ते होणार आहे.

या वर्षीचा सिंबायोसिस सांस्कृतिक पुरस्कार प्रसिद्ध अभिनेता आणि सिंबायोसिसच्या कला वाणिज्य महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी भूषण प्रधान यांना देण्यात येणार आहे. भूषण ने ३० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये तसेच रंगभूमी , वेबसिरीज आणि टीव्ही वर अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. लग्नकल्लोळ सारखे नवीन चित्रपटही आपल्याला या नवीन वर्षात पाहायला मिळतील. 

उदघाटन समारंभानंतर म्हणजेच गुरुवार, दिनांक २३ जानेवारी, २०२० रोजी जितेंद्र जयाप्रदा यांची प्रकट मुलाखत आणि गाजलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखतकार रेडिओ जॉकी (RJ) स्मिता ही जितेंद्र जयाप्रदा यांच्याशी संवाद साधताना मुलाखतीदरम्यान जितेंद्र जयाप्रदा यांच्या गाजलेल्या गाण्यांचे सादरीकरण प्रथितयश वाद्यवृन्द करणार आहेत. ज्यामध्ये गायक मकरंद पाटणकर, विवेक पांडे, राधिका अत्रे, कल्याणी देशपांडे- जोशी आदींचा समावेश आहे.

शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी वाजून ३० मिनिटांनी चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित "हसवा फसवी" या नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सदर नाटकाचे लेखक दिलीप प्रभावळकर असून नाटकाचे वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये मजली भूमिकांचा माजली हास्यकल्लोळ प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल ज्यामध्ये बहुरंगी भूमिकेत पुष्कर श्रोत्री सोबत योगिनी पोफळे आणि  विजय पटवर्धन यांच्या भूमिका असतील.

शनिवार, दिनांक २५ जानेवारी, २०२० रोजी सायंकाळी वाजून ३० मिनिटांनी निश एंटरटेनमेंट प्रस्तुत मराठी चित्रपटांच्या सांगीतिक दृकश्राव्य पाऊलखुणा- म्हणजेच "प्रभात ते सैराट" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रभात च्या सुरुवातीच्या काळातील चित्रपट कुंकू, माणूस पासून आताच्या सैराट पर्यंत चा मराठी चित्रपटसृष्टीचा  संपूर्ण प्रवास रसिकांना अनुभवता येणार आहे. सदर कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन मिलिंद ओक यांचे आहे. लेखक राहुल सोलापूरकर आणि निवेदन अमित वझे यांचे आहे, तसेच सोबत प्रतिथयश वाद्यवृंदाची साथ लाभलेली आहे.

वरील सर्व कार्यक्रम सिंबायोसिस संस्थेचे डॉ. आंबेडकर स्मारक खुले प्रेक्षागृह, सेनापती बापट मार्ग, पुणे येथे आयोजित करण्यात आले असून ते पुणेकर रसिकांना विनामूल्य खुले आहेत.

0 comments:

Post a Comment