पुणे : पुणे शहर
तमिळ संघटनेने कोथरूड
येथे पोंगल दिवस
आयोजित करून तमिळ संस्कृतीचे दर्शन
घडविले. या कार्यक्रमात
संघटनेच्या सदस्यांनी व त्यांच्या
मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन मनमुराद आनंद
लुटला. या कार्यक्रमामध्ये
संगीत, भरतनाट्यम, मोहिनी अटटम,
लोकनृत्य, मिमिक्री व फनी गेम्स
इ. स्पर्धा आयोजित
केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांसाठी तमिळ
पद्धतीचे स्वाधिष्ट व उत्कृष्ट
भोजन आयोजित करण्यात आले होते.
उपस्थितांच्या
मते, पुणे शहरातील
तमिळ रहिवाश्यांच्या सामाजिक
व सांस्कृतिक योगदानामुळेच हा कार्यक्रम
यशस्वीरीत्या पार पडला
व त्यामधून तमिळ
संस्कृतीचे दर्शन घडविले. पुणे
शहर तमिळ संघटना
दरवर्षी पोंगल उत्सव आयोजित
करतात व सोबतच
वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम व उपक्रम
राबवतात. डॉ. सत्यानारायणन
एल, उपाध्यक्ष पुणे
शहर तमिळ संघटना
हे संघटनेच्या माध्यमातून गरजवंतांसाठी
विविध धर्मादाय उपक्रम
राबवतात. या कार्यक्रमाकरिता
तमिळ संघटनेचे विविध
पदाधिकारी, खजिनदार श्री भास्कर,
सदस्य श्री गिरी,
श्री कृष्णमुर्ती, श्री
शेखर इ. उपस्थित
राहून कार्यक्रम पार
पाडण्याकरिता योगदान दिले.
super - Pongal vizha was celebrated in a grand scale
ReplyDelete