Wednesday, December 25, 2019

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय क्रिडास्पर्धांचे आयोजन

पुणे: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आधारस्तंभ माजी केंद्रीय कृषीमंत्री पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि. 27 डिसेंबर 2019 रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे - बालेवाडी पुणे येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध स्पर्धांमध्ये संस्थेच्या विविध शाखांतील 3150 खेळाडू सहभागी होणार आहेत. 

सध्याच्या धावपळीच्या जीवनात आज खेळ आणि व्यायामाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले असून विद्याथ्र्यांना लहानपणापासून खेळाची आवड निर्माण व्हावी, खेळाच्या माध्यमातून विद्याथ्र्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. या वर्षी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे - बालेवाडी पुणे येथे दि. 27 28 डिसेंबर 2019 रोजी संपन्न होत आहेत. 

सदरील स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडीयममध्ये खेळण्याची संधी उत्तेजन मिळाले आहे त्यामुळे आपल्या अनेक विद्याथ्र्यांची जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. हा उपक्रम विद्याथ्र्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून विद्याथ्र्यांमधील क्रीडावृत्तीस चालना मिळाली आहे. विद्याथ्र्यांसाठी क्रीडा प्रकारांसाठी आणि व्यायामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या क्रिडा स्पर्धांचे फलित म्हणून संस्थेच्या विविध शाखं
तील खेळाडूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरही नावलौकीक वाढविला आहे. संस्थेने चालू केलेल्या या उपक्रमामुळे सन 2012-13 ते 2018-19  अखेर आंतरराष्ट्रीय पातळीवर 51, राष्ट्रीय पातळीवर 270, राज्य पातळीवर, 476, अशा एकूण 797 खेळाडूंची निवड झालेली असून त्यापैकी आंतरराष्ट्रीय पातळीवर 35, राष्ट्रीय पातळीवर 146, राज्य पातळीवर 327 अषी एकूण 508 पदे विविध खेळाडूंना प्राप्त झाली आहेत. 

श्रीलंका, मास्को, सिंगापूर, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, बॅंकाॅक, थायलंड, भूतान देशात झालेल्या स्पर्धेत संस्थेच्या विद्यार्थी खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. अवंतिका नरळे लोणकर माध्यमिक विद्यालय मुंढवा या विद्यार्थिनीने नुकत्याच राष्ट्रीय पातळीवर झालेल्या क्रीडा स्पर्धेत 100 मीटर, 200 मीटर धावणे 4 ग् 100 मीटर रिले या तीनही प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून तिने एकूण तीन सुवर्ण पदके प्राप्त केलेली असून षालेय स्पर्धेत तीन सुवर्णपदके प्राप्त करणारी देशात ती एकमेव खेळाडू ठरलेली आहे. याशिवाय गतवर्षी दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतही 100 मीटरमध्ये तिने सुवर्णपदक प्राप्त करून ती देशात प्रथम आलेली आहे.

या स्पर्धेसाठी विद्यालयांचे हवेली, सिंहगड, शिवनेरी, मुळशी, इंदापूर, बारामती, राजगड, शिरूर, रायगड असे नउ (9) गट महाविद्यालयांचे पुरंदर आणि पिंपरी चिंचवड असे दोन गट (2) असे एकूण अकरा गट (11) तयार करण्यात आले. सदर अकरा गटांमध्ये कबड्डी खो-खो, व्हाॅलीबाॅल, रिले या सांघिक धावणे, कुस्ती, गोळाफेक, तायक्वांदो, बुडो मार्शल आर्ट, योगासने या मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धामध्ये संस्थेच्या सर्व शाखांमधील सुमारे 9500 खेळाडू सहभागी झाले होते. गटपातळीवर विजेते संघ/खेळाडू हे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा. अॅड. संदीप कदम, खजिनदार मा. अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव  . एम. जाधव, सर्व प्राचार्य, सर्व शाखाप्रमुख, क्रीडा शिक्षक संस्था मुख्य कार्यालयातील स्टाफ यांच्या अथक परिश्रमातून या क्रीडा स्पर्धा साकार होणार असून यातूनच भारताचे भावी आॅलिम्पिक विजेते घडतील असा विश्वास आहे.

0 comments:

Post a Comment