
राजस्थान जयपूर येथे पार
पडलेल्या आंतरराष्ट्रीय थ्रो-बॉल
स्पर्धेत 'महाराष्ट्र थ्रो-बॉल'
मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक
मिळविला. सदर संघात
औंध येथील रयत
शिक्षण संस्थेच्या डॉ.बाबासाहेब
आंबेडकर महाविद्यालयाच्या सौरभ बसवराज
वाघमारे याने उत्कृष्ट
खेळ दाखवल्याने त्याची
काठमांडू, नेपाळ येथे होणाऱ्या
'आंतरराष्ट्रीय आमातूर खेळ महाकुंभ'
स्पर्धेत थ्रो-बॉल
स्पर्धेसाठी निवड झाली
आहे.
त्याच्या या निवडीबद्दल
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवलिंग
मेनकुदळे यांनी अभिनंदन करून,
त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
दिल्या. त्याच्या या यशामध्ये
महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह, क्रीडा विभागप्रमुख प्रा.भीमराव पाटील, उपप्राचार्य
डॉ.संजय नगरकर
तसेच सर्व प्राध्यापक,
प्रशासकीय सेवक आणि
सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग
असून, सर्वांनी त्याचे अभिनंदन
करीत त्याला पुढील
वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 comments:
Post a Comment