पुणे - महाराष्ट्र राज्य शासनाने वतीने
घेतलेल्या स्पर्धा परिक्षा मध्ये
प्रशासकीय अधिकारी म्हणून यशसंपादन
केलेल्या भावी अधिकाऱ्यांचा
सत्काराचा कार्यक्रम घोलेरोड येथील
नेहरु सभागृहात झाला.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजकीय सेवेत काम
करताना स्वतः च्या कामातून
ओळख निर्माण करावी
त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना
पुढे घेऊन गेले
पाहिजे असे मत
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता
प्रवीण कोल्हे यांनी व्यक्त
केले. इन्फीनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या स्पर्धा परीक्षेतील यशस्वी
गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थित
सत्कार सोहळ्याचे आयोजन आयोजित करण्यात
आले होते.
याप्रसंगी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी
अभियंता संजय बोडखे,
डॉ जे. आर.पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमित
उबाळे, मिलिटरी ऑफ डिफेन्सचे,
आ इ एस पंकज
गाढवे, शिरीष
पोरेडी (कार्यकारी अभियंता प्रवक्ता
पिंपरी चिंचवड मनपा) प्रा
बालाजी चौधरी, इन्फीनिटी इंजिनिअरिंग
अकॅडमीचे संचालक गिरीश खेडकर, स्वप्नील
भोर ,मनोज कोकणे
आदी मान्यवर उपस्थित
होते.
पुढे बोलताना
प्रवीण कोल्हे म्हणाले की
इन्फीनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीचा प्रगतीचा
आलेख खूप चांगला आहे
त्यामुळे इन्फीनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फेभावी
शासकीय अधिकारी चांगले तयार
होत आहेत. प्रशासनात अधिकाऱ्यांनी समर्पणाची
भावना व जवाबदारीचे
भान ठेवावे. तसेच
अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी
संस्था प्रती सकारात्मक दृष्टीकोन
ठेवून काम करावे.
यावेळेस गुणवंत विद्यार्थिनी देविका कापसे म्हणाल्या
आयुष्यातील करियर प्रशासकीय सेवेत
करण्याचा आत्मविश्वास इन्फीनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीने दिला.
यावेळेस संचालक गिरीश खेडकर म्हणाले ग्रामीण
भागातील मराठी मुलांनी प्रशासकीय सेवेत
यावे या उद्देशाने दोन
वर्षांपूर्वी सुरू केलेल्या
या अकॅडमीचे मेरिट लिस्ट
मधील 172 पैकी 107 इन्फीनिटी अकॅडमीचे
विद्यार्थी आहेत. त्यामुळे आम्ही
सुरू केलेल्या प्रयत्न अकॅडमीच्या
माध्यमातून सफल होत
आहे असे दिसते.
यावेळेस विविध पदाकरिता उत्तीर्ण
झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या
हस्ते फेटा , शाल
,व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात
आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
प्रसाद बेडेकर यांनी
केले. यावेळेस पालक व
विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी
केली होती.
0 comments:
Post a Comment