Wednesday, December 18, 2019

रेडिओ मिर्चीतर्फे 'शेअर इट विथ स्वप्नील'चे दुसरे पर्व सादर

पुणे: रेडिओ मिर्ची 98.3एफएमचा प्रसिद्ध रेडिओ शो 'शेअर इट विथ ñdßZrb या  पहिल्या पर्वाला  भरपूर  यश मिळाल्यानंतर अभिनेता स्वप्नील जोशी  या सिझन चे दुसरे पर्व २३ डिसेंबर पासून पुन्हा घेऊन येत आहे.
'शेअर इट विथ स्वप्नील' शोमध्ये लोक त्यांचे नातेसंबंध, विवाह, त्यांचे यश आणि यशस्वी प्रेम द्वेषाच्या कथांबाबत सखोल गुप्त गोष्टी कबुलीजबाब देतात. शोच्या पहिल्या पर्वामध्ये मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांचा समावेश होता, जसे सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सचिन पिळगावकर, सुबोध भावे, अमृता खानविलकर, अमेय वाघ.

दुस-या पर्वाबाबत आपले मत मांडताना रेडिओ मिर्चीचे महाराष्ट्रातील क्लस्टर व्यवसाय प्रमुख श्री. एम एन हुसैन म्हणाले, ''आम्हाला 'शेअर इट विथ स्वप्नील' शोचे दुसरा पर्व सादर करताना आनंद होत आहे. पहिल्या पर्वाला हजारो प्रवेशिका मिळाल्या आणि महाराष्ट्रातील रेडिओ श्रेात्यांमध्ये तो खूपच लोकप्रिय ठरला. रेडिओ ऐकण्यास चुकणा-या लोकांसाठी कन्टेन्ट उपलब्ध करून देण्यासाठी होत असलेल्या प्रचंड मागणीमुळे आम्हाला घोषणा करताना आनंद होत आहे की, एसडब्ल्यूएस सीझन देखील मिर्ची मुंबई मराठी वेब रेडिओवर स्ट्रीम करण्यात येईल, जो गाना अॅपवर उपलब्ध आहे.''

या शोबाबत बोलताना स्वप्नील म्हणाला, ''मिर्चीच्या रेडिओ स्टेशन्स नेटवर्कवरील 'शेअर इट विथ स्वप्नील' शोच्या पहिल्या पर्वाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून मला खूप आनंद झाला आहे. मला आनंद होत आहे की, लोकांनी माझ्या चित्रपटांप्रमाणेच रेडिओ अवताराचा देखील स्वीकार केला. सीझन पुरुष त्यांच्या जीवनातील महिलांबाबत कबुलीजबाब देण्यावर फोकस देईल आणि म्हणूनच थीम आहे 'बोल ती ऐकतेय', म्हणजेच मराठीत असा अर्थ होतो की 'तू सांग, ती ऐकत आहे'. 'शेअर इट विथ स्वप्नील' शोची अधिक काळ वाट पाहू शकणा-यांसाठी माझ्याकडे काही चांगल्या बातम्या आहेत.

शोचे पर्व गाना अॅपवरील मिर्ची मुंबई मराठी चॅनेलच्या माध्यमातून प्रथम मुंबईतील श्रोत्यांसाठी सुरू करण्यात येईल. मला आनंद होत आहे की, हा शो फक्त ठराविक भौगोलिक सीमेपुरतीच मर्यादित राहणार नाही. या ऑनलाइन व्यासपीठामुळे मुंबईकर प्रवास करत असताना देखील माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. मी आशा करतो की, श्रोते सीझन प्रमाणेच या सीझनचा देखील आनंद घेतील. तर मग फक्त महाराष्ट्रातील लोकांनाच नव्हे तर सर्व भारतीयांना आवाहन करण्यात येणार आहे की 'सोड स्ट्रेस, कर कन्फेस'.''

यंदा शोमध्ये एक नवीन विभाग असणार आहे 'कुछकट्टा'. यामध्ये सेलिब्रिटीज देखील सोशल मीडिया व्यासपीठावर त्यांना मिळणा-या क्षुद्र संदेशांबाबत दिलेल्या गुप्त प्रतिक्रियांची देखील कबुली देणार आहेत. शोचा कन्टेन्ट मिर्चीच्या सोशल मीडिया व्यासपीठांवर पॉडकास्ट्सच्या रूपात सादर करण्यात येईल.

0 comments:

Post a Comment