पुणे : क्रीडा भारती पुणे व पुणे महानगर पालिकेच्या संयुक्त
विद्यमाने पावन खिंड युवा दौड २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक ५ जानेवारी
२०२० रोजी सकाळी ६ वाजता पुणे विद्यापीठाच्या मैदानावरून दौडला प्रारंभ होणार आहे.
मैदानी खेळांना प्रोत्साहन, या उद्देशाने दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडमध्ये
सर्व वयोगटातील स्पर्धकांना प्रवेश असून, यासाठी नावनोंदणी सुरू आहे, अशी माहिती क्रीडा
भारती पुणेचे अध्यक्ष शैलेश आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी शिक्षण प्रसारक
मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, विजय भालेराव,
कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजन गोºहे, पुणे महानगर पालिका
क्रीडा समितीचे अध्यक्ष विजय शेवाळे, क्रीडा अधिकारी एस. एस. पूरी, क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी,
विजय पुरंदरे, क्रीडा भारती पुणेचे स्पर्धा प्रमुख प्रदीप अष्टपुत्रे व क्रीडा भारतीचे
पदाधिकारी उपस्थित होते. नावनोंदणी २३ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. नावनोंदणीसाठी
९५९५३४४५००, ९५९५२०२२१९, ९३७२८४६४७५, ८८७९४१६१७० या क्रमांकांवर सपंर्क साधावा.
https://kreedabhartipune.com/yuva-daud-2020?1
या संकेतस्थळावर नाव नोंदवता येणार आहे.
युवा दौडच्या उद्घाटनाला
क्रिकेटपटू गौतम गंभीर, धावपटू ललिता बाबर, महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, संचालक डॉ. दीपक माने व विविध क्षेत्रातील
मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सकाळी
८.३० वाजता पुणे विद्यापीठाच्या मैदानावर होणार असून, यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे,
आमदार सुनील कांबळे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पुणे महानगर पालिका क्रीडा
समितीचे अध्यक्ष विजय शेवाळे आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
नगरसेवक धीरज घाटे यांचे उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले आहे.
यावेळी दौडमध्ये औद्योगिक
क्षेत्रातील कर्मचारी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी असे १२ ते ५५
वयोगटातील स्पर्धक सहभागी होणार आहे. तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती पुरस्कार
विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, असे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू सहभागी होणार
आहेत. विजेत्या धावपटूंसाठी तब्बल ५ लाख १० हजार रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली
आहेत. ज्या शाळा, बँक व सामाजिक संस्थेतील सर्वाधिक स्पर्धक सहभागी होतील त्यांना विशेष
पारितोषिक देण्यात येणार आहे.
प्रदिप अष्टपुत्रे
म्हणाले, युवा दौडमध्ये वयोगटानुसार ३ किलोमीटर, ५ किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा अंतराच्या
स्पर्धा होणार आहेत. ३ किलोमीटरचा मार्ग स्पोर्टस ग्राऊंड- मेन बिल्डिंंग- इंटरनॅशनल
स्टुडंट हॉस्टेल- सी-डॅक- स्पोर्टस ग्राऊंड असा असणार आहे. ५ किलोमीटरसाठी स्पोर्टस
ग्राऊंड- मेन बिल्डिंंग- इंटरनॅशनल स्टुडंट हॉस्टेल- सी-डॅक- वनशास्त्र विभाग- स्पोर्टस
ग्राऊंड. तर १० किलोमीटरसाठी स्पोर्टस ग्राऊंड-आयुका गेट- ब्रेमेन चौक- विद्यापीठ रस्ता-
विद्यापिठाचे मुख्य प्रवेशद्वार- औंध मार्गावरील प्रवेशद्वार- व्हीसी हाऊस- स्पोर्टस
ग्राऊंड असा मार्ग असणार आहे.
0 comments:
Post a Comment