Friday, November 22, 2019

बॉक्स ऑफिसवर फत्तेशिकस्तची दमदार वाटचाल


चित्रपटाच्या माध्यमातून शिवचरित्र आजच्या पिढीसमोर पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या फत्तेशिकस्तया चित्रपटाला मान्यवरांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा जोरदार कौल मिळत आहे. कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेल्या फत्तेशिकस्तची बॉक्स ऑफिसवर दमदार वाटचाल सुरू आहे. चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद दिवसागणिक वाढत असून पहिल्या आठवड्यात ४०० चित्रपटगृहांत प्रदर्शित होत या चित्रपटाने तब्बल .६५ कोटींची कमाई केली आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रभरातील प्रमुख शहरांतून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. याखेरीज महाराष्ट्राबाहेर गुजरात,गोवा, कर्नाटक, निजाम, दिल्ली, मैसूर या शहरांतूनही फत्तेशिकस्तची क्रेझ वाढतेय.

उत्कंठावर्धक कथानक, पटकथेची मुद्देसूद मांडणी, मार्मिक संवाद, कलाकारांचा सुरेख अभिनय, नयनरम्य लोकेशन्स, उत्तम व्हिएफएक्स, शिवकालीन वेशभूषा, सुमधूर संगीत, धडाकेबाज अॅक्शन्स आणि नेत्रसुखद सादरीकरण हे सर्व दिग्दर्शकांनी चांगल्या पद्धतीने दाखविल्याने एक उत्कृष्ट चित्रपट पाहिल्याचे समाधान प्रेक्षकांनी व्यक्त केले. शिवाजी महाराजांनी आपल्या शूर मावळ्यांना एकत्र करत स्वत:चे युद्धशास्त्र स्थापित केले आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा चमत्कार एका रात्रीत झाला नाही. त्यासाठी अपरिमित कष्ट उपसावे लागले. याची आपल्या सर्वांना जाणीव करून देणारा हा चित्रपट शिवभक्तांच्या आशीर्वादाने प्रत्येकापर्यंत यशस्वीरीत्या पोहचतोय.

सर्वजण चित्रपटातील संवादांपासून-गाण्यांपर्यंत आणि अभिनय, अॅक्शनपासून-व्हिएफएक्सपर्यंत सगळ्याच गोष्टीचं कौतुक करत आहेत. स्वराज्याची ही गौरवगाथा सिनेरसिकांच्या चांगलीच पसंतीस पडली असून फत्तेशिकस्त चित्रपटाची ही यशस्वी घोडदौड प्रत्येक मराठी मनासाठी निश्चितच आनंददायी अनुभव आहे यात शंका नाही.

0 comments:

Post a Comment