Monday, November 25, 2019

सिंहगड, राजगड, तोरणा आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉन रविवारी

पुणे : वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनच्या वतीने सिंहगड-राजगड-तोरणा या किल्ल्यांवर अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक डिसेंबर २०१९ रोजी ही स्पर्धा होणार आहे.
एकाच वेळी किल्ल्यांवर स्पर्धक धावणार असून तब्बल ११ देश, भारतातील २२ राज्ये आणि ५७ शहरातील स्पर्धक स्पर्धेत सहभागी होणार आहेत
पुण्यात होणारी ही स्पर्धा युटीएमबी म्हणजेच अल्ट्रा-ट्रेल डी-माँट-ब्लाँकच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडली गेली आहे. स्पर्धेत भारतासह कॅनडा, जर्मनी, स्वित्झर्लंड,बांग्लादेश, हाँगकाँग, जपान, फ्रान्स,  इंडोनेशिया, व्हिएतनाम यांसह ११ देशातील स्पर्धक सहभागी होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त दिग्विजय जेधे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्थेचे विश्वस्त अनिल पवार, अमर धुमाळ, मंदार मते, मारुती गोळे, महेश मालुसरे उपस्थित होते. पूरतत्व विभागाचे विलास वहाणे, वनविभागाच्या श्रीलक्ष्मी .,  भोर वनविभागाच्या आशा भोंग, ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील, पर्यटन विभागाच्या सुप्रिया करमरकर यांचे विशेष सहकार्य लाभले असून ग्रामस्थांचे देखील स्पर्धेसाठी सहकार्य मिळाले आहे. काचंनजुंगा करणारे पहिले महाराष्ट्रीयन आणि एव्हरेस्टवीर हर्षद राव हे यंदाच्या मॅरेथॉनचे डायरेक्टर आहेत. यंदा ३५० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले असून मागील वर्षी ही संख्या २१८ इतकी होती.

अनिल पवार म्हणाले, डिसेंबर रोजी पहाटे .४५ वाजता, सिंहगड पायथ्यालगत गोळेवाडी चौकापासून स्पर्धा सुरू होईल. यंदा ५३ किलोमीटरचा मार्ग असणार आहे. स्पर्धेत पुरूष महिला असे दोन गट आहेत. ११ किलोमीटर स्पर्धा सिंहगड पायथा ते नरवीर तानाजी मालुसरे समाधी आणि पुन्हा पायथ्यापर्यंत अशी होणार आहे. २५ किलोमीटर स्पर्धा सिंहगड ते राजगड  पायथा अशी होणार आहे.  तर ५३ किलोमीटर स्पर्धा सिंहगड-राजगड-तोरणा (सिंहगड पायथ्यापासून सुरू होऊन ती गडामार्गे कल्याण दरवाजा , विंझर साखरगाव-गुंजवणे, राजगड किल्ला, सुवेळा माची, संजिवनी माची मार्ग, डोंगररांगेतून बुधला माची, तोरणा किल्ला करून वेल्हेमार्गे तोरणा किल्याच्या पायथ्याला समाप्त होईल.

मंदार मते म्हणाले, एसआरटी मॅरेथॉनचे हे दुसरे वर्ष असून जगभरातील माऊंटन रनर्स साठी ही एक रोमांचक स्पर्धा असणार आहे. शर्यतीची एकत्रीत उंची जवळपास २४०० मिटर (७८७५ फूट) एवढी होते. स्पर्धकांकडून उच्चस्तरीय सहनशक्ती तसेच पर्वतांवर धावण्याचा अनुभव आवश्यक आहे. स्पर्धेचे उद्घाटन आमदार रोहित पवार आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती महेश मालुसरे यांनी दिली.

एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन ही जगप्रसिद्ध युटीएमबी २०२० साठी पात्र मॅरेथॉन - एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशनशी संलग्न आहे.  तसेच ही मॅरेथॉन युरोपमध्ये होणाºया युटीएमबी म्हणजेच अल्ट्रा-ट्रेल डी-माँट-ब्लाँक २०२० साठी पात्र मॅरेथॉन आहे. फ्रान्समध्ये होणारी ही मॅरेथॉन जगातील सर्वोत्तम माऊंटन मॅरेथॉन मानली जाते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक गुण एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन मधून मिळणार आहे. त्यामुळे पुण्यात होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडली जाणार आहे, अशी माहिती ॅड. मारुती गोळे यांनी दिली.

0 comments:

Post a Comment