Friday, October 18, 2019

सिद्धार्थ शिरोळे यांचा शिवाजीनगरसाठी ‘निर्धारनामा’

पुणे: शिवाजीनगर मतदार संघातील भारतीय जनता पक्ष- शिवसेना- आरपीआय (A), रासप आणि शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर मतदार संघाच्या विकासाचा रोडमॅपनिर्धारनामाच्या स्वरूपात  तयार केला असून त्याचे प्रकाशन आज पत्रकार परिषदेत करण्यात आले. खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे, माजी खासदार अनिल शिरोळे, आरपीआयचे परशुराम वाडेकर, नगरसेवक शंकर पवार आदी उपस्थित होते

या वेळी बोलताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “शिवाजीनगर मतदार संघाच्या विकासाला गेल्या काही वर्षांत एक दिशा मिळालेली असून आता नजीकच्या भविष्यात योग्य दिशेने गतिमान वाटचाल करण्यासाठी एक निश्चित कार्यक्रम समोर असावा या दृष्टीकोनामधून आम्ही हानिर्धारनामातयार केला आहे. या निर्धारनाम्याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये शिवाजीनगर मतदारसंघातील नागरिकांना काय वाटते, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांच्या दृष्टीने समस्या कोणत्या आहेत याची आम्ही पाहणी केली. याबरोबरच डेटा विश्लेषणाच्या माध्यमातून आम्ही युवकांचीही मते जाणून घेतली. या सर्व बाबींमधून समोर आलेल्या मुद्द्यांवर आम्ही हानिर्धारनामातयार केला आहे. शिवाजीनगर मतदार संघासाठी हानिर्धारनामा-या अर्थानेरोडमॅपठरेल असा माझा विश्वास आहे.

यावेळी बोलताना खासदार गिरीश बापट म्हणाले, “शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ गॅस सिलिंडरमुक्त करण्यासाठीचा प्रकल्प आम्ही राबवित आहोत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोपासून विविध उपाययोजना देखील करण्यात येत आहेत. सिद्धार्थ शिरोळे यांचा  निर्धारनामा हा पक्षाच्या धोरणांना अनुसरून असून आम्ही सर्व त्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न करू.”

खासदार संजय काकडे म्हणाले, सिद्धार्थ शिरोळे यांना राजकीय वारसा असला तरी,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते लाडके आहेत. त्यांच्या विजयासाठी विशेष लक्ष ठेवण्याची जबाबादारी मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर सोपविली आहे. त्यात आम्ही सगळ्यांनीच लक्ष घातले आहे. त्यामुळे सिद्धार्थ किमान ३५ ते ४० हजार मतांनी विजयी होतील असा मला विश्वास आहे.

शिवाजीनगरमध्ये सुरू झालेली विकास प्रक्रिया या पुढेही सुरू राहणार आहे. मेट्रो, समान पाणी पुरवठा, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आदींचा यामध्ये समावेश आहे. या मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्ष- शिवसेना महायुती कटीबद्ध असल्याचे अनिल शिरोळे यांनी नमूद केले.

या निर्धारनाम्यात मतदार संघातील वाहतूक, मेट्रो प्रकल्प, वातावरणातील बदलांमुळे होणा-या परिणामांवरील उपाययोजना, कृती आराखडा, आधुनिक कचरा व्यवस्थापन, प्रदूषणावर मात करण्यासंबंधीच्या उपाययोजना, उद्योगांना हातभार लावावा यासाठीचे कार्यक्रम, खडकी कॅन्टोन्मेंटचा विकास, उर्जा व्यवस्थापन, पदपथांवरील अतिक्रमण, ओढ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठीच्या उपाययोजना, महिला सुरक्षा आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

शहरातील वाहतुकीसंदर्भात शिवाजीनगर हिंजवडी या २३ किमीच्या मार्गावरील मेट्रोच्या कामास गती देण्याबरोबरच २०२१ पर्यंत ते पूर्ण व्हावे यासाठी पाठपुरावा करणे, शहरातील बसमार्ग बसचे वेळापत्रक यांची फेरआखणी आणि कायमस्वरूपी प्रदूषणविरहित, किफायतशीर दरातील इलेक्ट्रिक बससेवा उपलब्ध करून देणे यासाठी सिद्धार्थ शिरोळेच्या वतीने प्रयत्न करण्यात  आहेत.

वातावरणातील बदलाचे परिणाम हे आता थेट सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू लागले आहे. या कडे गांभीर्याने पाहत या संकटाना तोंड देण्याच्या दृष्टीकोनाने जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम हाती घेणे, ‘राज्य कृती योजनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यावर शिरोळे यांचा भर असेल. याबरोबरच ओढ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी ओढे- नाल्यांच्या पूरेषेतील अतिक्रमणे रोखणे, ओढ्यांची बांधबंदिस्ती अधिक मजबूत करणे, त्यांचा नैसर्गिक प्रवाह कायम राखण्यासाठी खबरदारे घेणे, या ठिकाणी कचरा साचणार नाही याची काळाचे घेणे स्थानिकांचे संघटन करून त्यांची काळजी घेण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येतील.        

कचरा हा महानगरांमधील व्यवस्थापनाचा महत्त्वाचा विषय असून त्याचे व्यवस्थापन करीत असताना ऊर्जानिर्मितीचे धोरण अवलंबणे, महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करणे, मोठ्या सोसायट्यांना ऊर्जानिर्मितीसाठी प्रोत्साहित करणे, हवेतील प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी त्यावर ठोस उपाययोजना करणे यांवर शिरोळे यांचा भर असणार आहे. यामध्ये विविध सामाजिक संस्था, रिक्षाचालक, बसचालक, कारचालक यांना सहभागी करून घेत लहान मुले, युवक यांसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृत कार्यक्रम राबविणे, शिवाजीनगरचा रोजचा तुलनात्मक निर्देशांक देणे, व्यापक प्रमाणावर स्थानिक प्रजातींच्या वृक्षाची लागवड, प्रमुख चौकात प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मोठे एइर प्युरिफायर बसविण्याचे काम हाती घेण्यात येईल. मतदार संघातील सोसायट्यांमध्ये सौरउर्जेचा वापर वाढावा यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील.  

आयटी सिटी म्हणून पुण्याची ओळख असताना शहरातील मोठ्या उद्योजकांबरोबर लघु आयटी उद्योजकांना सवलती मिळाव्यात आणि आयटी लघु उद्योजकांना घरगुती दराने वीजबिल आकारणी व्हावी यासाठी देखील पाठपुरावा करण्यात येणार आहे. खडकी कॅन्टोन्मेंटच्या  विकासाठी आता राज्य शासनाचा निधी मिळण्यास प्रारंभ झाला असून या परिसरातील सुविधा अधिक बळकट करण्यासाठी नागरिक आणि प्रशासन यांमध्ये भविष्यात समन्वय साधण्यात येणार आहे. याशिवाय पदपथांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी पाठपुरावा, फेरीवाल्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी प्रयत्न आणि महिला वर्गाला एक सुरक्षित मतदार संघ ही ओळख देण्यासाठी सार्वजनिक जागी मोठ्या प्रमाणात सीसीतीव्हे कॅमेरे बसविणे, उद्याने, मैदाने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था उत्तम असावी यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार देखील या निर्धारनाम्यात करण्यात आला आहे.

0 comments:

Post a Comment