Monday, October 14, 2019

अनंता, आरतीने जिंकली पुणे हाफ मॅरेथॉन


पुणे : पुणे रोड रनर्स, ॅव्हरोम स्पोर्टस आणि एचडीएफसी बँक युनाईट  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एचडीएफसी युनाईट पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात अनंता टी. एन. याने, तर महिला गटात नाशिकच्या आरती देशमुखने बाजी मारली. अनंताने २१ किलोमीटरची ही हाफ मॅरेथॉन तास १५ मिनिटे ३५ सेकंद वेळ नोंदवून जिंकली, तर आरतीने तास ३४ मिनिटे १३ सेकंद वेळ नोंदवून अव्वल क्रमांक पटकावला.

पाषाण रस्त्यावरील पुणे ग्रामीण पोलीस ग्राउंड येथून मॅरेथॉनला सुरुवात झाली. खासदार सत्यपाल सिंग आणि एचडीएफसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश कुमार रेलन यांच्या हस्ते मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण  एचडीएफसी बँकेचे सर्कल हेड राजा उपाध्याय, विबग्योरच्या प्राचार्य मनिषा नावायथ यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे रोडरनरचे डॉ. विवेक बिल्लमपल्ली, मनोज ठाकूर, रोहीत रॉय उपस्थित होते. पाणी वाचवा आणि फिट इंडियाचा असा संदेश या मॅरेथॉनमधून देण्यात आला. यंदाच्या या मॅरेथॉनचे हे दुसरे वर्षे होते.  मुख्य हाफ मॅरेथॉनसह १० किलोमीटर अंतराचीही शर्यत झाली. विजेत्या धावपटूंना एकूण एक लाख ६५ हजारांची रोख पारितोषिके देण्यात आली.

२१ किलोमीटर हाफ मॅरेथॉनसाठी पुणे ग्रामीण पोलीस ग्राउंड पाषाण - व्हर्टीस टेक्नोलॉजी - एनसीएल- आदित्य शगुन मॉल- पाषाण चौक ते पुन्हा पुणे ग्रामीण पोलीस ग्राउंंड असा मार्ग होता.  

पुरुष खुल्या गटात अनंताने तास १५ मिनिटे ३५ सेकंद वेळ नोंदवून पहिला क्रमांक पटकावला. राहुल देशमुखने तास १५ मिनिटे ५८ सेकंद वेळ नोंदवून दुसरा, तर रवींद्र गोरेने तास १६ मिनिटे ४० सेकंद वेळ नोंदवून तिसरा क्रमांक पटकावला. महिला खुल्या गटात आरतीने तास ३४ मिनिटे १३ सेकंद वेळ नोंदवून पहिला क्रमांक मिळवला. एकूण स्पर्धकांमध्ये ती सातव्या स्थानावर राहिली. हिमांगी गोडबोलेने ( तास ५३ मिनिटे १० से.) दुसरा, तर नेत्रा पेलपकरने ( तास ५४ मिनिटे ३९ सेकंद) तिसरा क्रमांक मिळवला.

निकाल : २१ किलोमीटरपुरुष - अनंता टी. एन. - तास १५ मिनिटे ३५ सेकंद, राहुल देशमुख - तास १५ मिनिटे ५८ सेकंद, रवींद्र गोरे - तास १६ मिनिटे ४० सेकंद, नाओल वर्कनेह - तास २८ मिनिटे ३४ सेकंद, लक्ष्मण विठ्ठल सरमालकर - तास ३३ मिनिटे ३१ सेकंद.

महिला - आरती देशमुख तास ३४ मिनिटे १३ सेकंद, हिमांगी गोडबोले - तास ५३ मिनिटे १० सेकंद, नेत्रा पेलपकर - तास ५४ मिनिटे ३९ सेकंद, निकिता हेन्री - तास ५६ मिनिटे ४९ सेकंद, पायल डागा - तास ५७ मिनिटे०७ सेकंद.

१० किलोमीटर - पुरुषआकाश परदेशी - ३४ मिनिटे १७ सेकंद, शानदेरसिंग - ३४ मिनिटे १९ सेकंद, अमर भोसले - ३४ मिनिटे ३७ सेकंद, नारायन विशी- ३५ मिनिटे ०४ सेकंद, अमोल चास्कर - ३५ मिनिटे ०८ सेकंद. महिला - विनया मालुसरे - ४३ मिनिटे ४१ सेकंद, समिक्षा खरे - ५० मिनिटे ३२ सेकंद, अर्चना ओक - ५३ मिनिटे ३९ सेकंद, रिचा जोशी - ५४ मिनिटे ४२ सेकंद, निकिता अगरवाल - ५७ मिनिटे ०८ सेकंद.

0 comments:

Post a Comment