Thursday, August 8, 2019

डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यावर दृक-श्राव्य कार्यक्रम

8/8/2019

पुणे: संगीतसूर्य डॉ. वसंतराव देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि 36व्या पुण्यतिथीनिमित्ताने डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या कलात्मक व्यक्तिमत्वाचा आढावा घेणारा डॉ. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी महोत्सव 2019’ हा दृकश्राव्य कार्यक्रम सोमवारदि. 12 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे.

डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान आणि बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त जयराम पोतदार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दि. 2 मे 2019 पासून डॉ. वसंतराव देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्यांना मानवंदना देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात पं. जयराम पोतदार यांनी वसंतराव देशपांडे यांच्या कलात्मक जीवनावर लिहिलेले संगीतसूर्य : डॉ. वसंतराव देशपांडे’ हे पुस्तकत्याचप्रमाणे 13 संगीत नाटकांवर आधारित कथामय नाट्यसंगीत’ तसेच नाट्यसंगीताच्या विविध पैलूंवर आधारित बहुआयामी नाट्यसंगीत’ अशा तीन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. पुस्तकांविषयी पं. सत्यशील देशपांडेपं. सुरेश साखवळकर आणि प्रसिद्ध साहित्यिक वामनराव देशपांडे बोलणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे तर प्रमुख पाहुणे म्हणून पंडित हृदयनाथ मंगेशकर तसेच पंडित सत्यशील देशपांडेडॉ. विकास कशाळकर,प्रसिद्ध साहित्यिक वामनराव देशपांडेविजय उर्फ बापू वसंतराव देशपांडेबालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष पं. सुरेश साखवळकर यांची उपस्थिती असणार आहेत.

दहा मिनिटांच्या मध्यंतरानंतर उत्तरार्धात वसंतराव देशपांडे यांच्या कलात्मक जीवनाचा आढावा घेणारा दृक-श्राव्य कार्यक्रम विश्लेषणासह आयोजित केला आहे. यात पं. सत्यशील देशपांडेडॉ. विकास कशाळकर आणि जयराम पोतदार यांचा सहभाग असणार आहे. सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी करणार आहेत. या वेळी सुरेश रानडे, आसावरी नितीन उपस्थित होते.

हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे.

0 comments:

Post a Comment