Monday, August 19, 2019

बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचार्‍यांमध्ये आरोग्य जागरूकत

प्रसिद्ध फिटनेस तज्ञ महेंद्र गोखले यांनी दिनांक 16 ऑगस्ट 2019 रोजी बँक ऑफ़ महाराष्ट्रच्या लोकमंगल स्थित मुख्यालयी बैलेंसिंग वर्क, लाइफ एंड फिटनेस यावर माहिती दिली. यावेळी बँकेचे कार्यकारी संचालक . सी. राउत आणि कार्यकारी संचालक हेमन्त टम्टा यासह मुख्य सतर्कता अधिकारी एल. एन. रथ उपस्थित होते.

गोखले यांनी जीवनाच्या विविध टप्यांच्या प्राथमिकतेवर विस्ताराने मार्गदर्शन केले आणि व्यायामास आपण अत्युच्च प्राथमिकता द्यावी याबाबत संगितले कारण आजारपण सुरू झाल्यावर व्यायाम हिच मग सर्वोच्च प्राथमिकता बनते. बँकेचे कार्यकारी संचालक . सी. राउत आणि कार्यकारी संचालक हेमन्त टम्टा यांनी सर्व उपस्थितांना नियमित व्यायामासाठी अपील केले.

0 comments:

Post a Comment