
यावेळी कार्यक्रमाचे समन्वयक प्रशांत शहा, विकास भंडारी उपस्थित होते. कार्यक्रमाला साधू वासवानी मिशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ग्लोबलच्या मुख्य अधिकारी मंजू निछानी, बी.यु.भंडारीचे चंद्रवदन भंडारी, देवेन भंडारी उपस्थित राहणार आहेत. पुणे शहरातील महापालिकेच्या शाळेतील सर्वोत्तम ४५ मुलांची निवड यासाठी करण्यात आली आहे. तब्बल १ तास या गाडीतून फिरण्याचा आनंद विद्यार्थी घेणार आहेत. जगातील सर्वोत्तम गाडीमधून फिरण्याचा आनंद तसेच त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशांत शहा म्हणाले, आयुष्य जगण्यासाठी आवश्यक अशा भावनिक कौशल्याचा अभाव आताच्या पिढीमध्ये जाणवतोय. आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलणारी मुले, मोबाईलचे व्यसन, नातेसंबंधांमधील तणाव या सगळ्याचे मूळ कारण पुरेशा तयारीचा अभाव आणि नकारात्मक भावना हे आहे. एकीकडे मुलांमध्ये प्रचंड गुणवत्ता दिसून येते तर दुसरीकडे नैराश्य. यावर मात करायची असेल, तर समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे आणि कीप मूविंग मूव्हमेंट हेच काम करीत आहे. लाईफ स्कूल फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे हा कार्यक्रम राबविला जातो. मुलांना आयुष्याकडे सकारात्मकरित्या बघायला शिकवणे हाच या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे.
ज्योती गोसावी म्हणाल्या, पुण्यातील आणि पुण्याबाहेरील सुमारे ६० गावांमधून ७५० स्वयंसेवकांच्या मदतीने शाळेमध्ये ९ वी आणि १० वी च्या मुलांसाठी पंधरा दिवसातून एकदा भावनिक कौशल्यावर आधारित कार्यशाळा घेतल्या जातात. या कार्यशाळेची मांडणी मुलांना आवडेल अशी असते, नुसतेच भाषण न देता मुलांना सहभागी करून घेण्यावर भर असतो. शिक्षण क्षेत्रातील अनेक सन्मान संस्थेला प्राप्त झाले आहेत. या उपक्रमाची सुरुवात २०१० मध्ये फाऊंडेशनचे संचालक नरेंद्र गोईदानी यांनी केली. भारत, श्रीलंका, नेपाळ या ३ देशातील ५० शहरांमध्ये संस्थेचे काम सुरु आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ३० हजार शिक्षक आणि २ लाख ५० हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले आहे.
0 comments:
Post a Comment