पुणे: अभिषेक प्रॉडक्शन
प्रस्तुत, सुभाष गणपतराव काकडे
निर्मित, संतोष चिमाजी जाधव
दिग्दर्शित तांडव हा मराठी
चित्रपट येत्या २४ मे
पासून सर्वत्र प्रदर्शित
होत आहे. यासंबंधी
माहिती देण्यासाठी पुण्यात आयोजित
पत्रकार परिषदेला चित्रपटातील कलावंत
अभिनेते प्रशांत तपस्वी, छाया
इंदुलकर, राजेंद्र कोंढरे, शांताराम
कुंजीर, बाबाराजे देशमुख, आदी
उपस्थित होते. ह्या चित्रपटातील
सोशल मीडिया असोसिएट
सेंसिओ सॉफ्टकॉन, अशोक उंदरे
हे हि उपस्थित
होते.
तांडव चित्रपटाची
संकल्पना रामेश्वर गणपतराव काकडे
यांची असून हा
चित्रपट सध्य परिस्थितीवर
आधारित असेल. मुलींवर होणारे
अन्याय अत्याचारा विरुद्ध भाष्य
करताना दिसत आहे.
या अन्यायाविरुद्ध मुलींना
सक्षमीकरणाचे धडे देणारा
हा चित्रपट. त्याचप्रमाणे
प्रत्येक घरात छत्रपती
शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी
अगोदर जिजाऊ घडल्या
पाहिजे असे भाष्य
करणारा चित्रपट म्हणजे तांडव,
निर्माते आणि लेखक
सुभाष गणपतराव काकडे
यांनी सांगितले.
संतोष चिमाजी जाधव यांनी
उत्तम रित्या दिग्दर्शन
केले आहे. तांडव
या चित्रपटासाठी अंदाजे
२०० मुलींमधून अभिनेत्री
पुजा हिची महिला
पोलिस इंस्पेक्टर या
भूमिकेसाठी निवड करण्यात
आली. अभिषेक प्रॉडक्शन
निर्मिती संस्थेकडून पुजाला या
चित्रपटासाठी फिजिकल फिटनेस, बुलेट
बाईक, लाठी, काठी
आणि तलवारबाजी याचे
प्रशिक्षण देण्यात आले. अगदी
उत्तमपणे तिने पोलीस
अधिकारी, “कीर्ती मराठे पाटील”
हि भूमिका साकारली
आहे.
सयाजी शिंदे या चित्रपटात
एका जिल्ह्याचे पालकमंत्री
म्हणून भूमिका करत आहेत.
त्या पालकमंत्र्याला त्याच्या
या पदाविषयी खूप
माज असतो. त्या
पदाचा तो गैरफायदा
घेत लोकांवर अन्याय
करत असलेला भ्रष्ट
असा पालकमंत्री आहे.
एकंदरीत त्यांची फारच गंमतीशीर
अशी भूमिका आहे.
या चित्रपटामध्ये अरुण नलावडे
एका प्रामाणिक पोलीस
हवालदाराच्या भूमिकेत तर आशिष
वारंग भ्रस्ट पोलीसाच्या
भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
त्याच बरोबर स्मिता
डोंगरे यांनी कीर्तीच्या आईची,
तर प्रशांत तपस्वी
यांनी वडिलांची भूमिका
दमदारपणे साकारली आहे. अनिकेत
कांझारकर यांनी वकिलाची भूमिका
केली असून, कीर्तीला
तिच्या संकटकाळी भक्कमपणे पाठिंबा
दिलेला आहे.
रणरागिणी महिला पोलिस इंस्पेक्टरची
गाथा सांगणारा तांडव
चित्रपट २४ मे
ला प्रदर्शित होत
आहे.
0 comments:
Post a Comment