Saturday, May 18, 2019

नूपुर नाद महोत्सव 25 मे रोजी

शास्त्रीय नृत्य  शास्त्रीय गायन यांचा मनोहारी मिलाफ असणारा ‘नूपुर नाद महोत्सव’ यंदा शनिवारदि. 25 मे2019 रोजी सायंकाळी 5 वाजता कोथरूड येथील डॉशामराव कलमाडी प्रशालेतील शकुंतला शेट्टी सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
विख्यात भरतनाट्यम् नृत्यांगना  अभिनेत्री बंगलोरच्या रूक्मिणी विजयकुमार यांचे बहुचर्चित अभिमता एकल नृत्यनाट्य आणि प्रख्यात शास्त्रीय गायक पंसंजीव अभ्यंकर यांचे सुरेल गायन यांचा हा कार्यक्रम नूपुर नाद आणि श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहेया नूपुर नाद महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष आहेयास प्रवेशमूल्य आहे.
भरतनाट्यम् नृत्यांगना डॉस्वाती दैठणकर  संतूरवादक डॉधनंजय दैठणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नूपुर नाद महोत्सवात यापूर्वी पंशिवकुमार शर्मामालविका सरूक्काईपंसुरेश तळवलकरपंउल्हास कशाळकरराहुल शर्माजयतीर्थ मेकुंडीप्रवीण गोडखिंडीअलरमेल वल्लीव्यंकटेश कुमार सारख्या दिग्गज कलाकारांनी आपली कला रसिकांच्या भरघोस प्रतिसादात सादर केली आहे.



0 comments:

Post a Comment