Friday, April 12, 2019

बारणे-जगताप यांच्यात अखेर समेट

पुणे: मावळमधील शिवसेनेचे विद्यमान 
खासदार श्रीरंग बारणे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात समेट घडविण्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना यश आले आहे. यानंतर दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मनोमिलन झाल्याचे स्पष्ट केले. बारणे आणि जगताप यांच्यातसमेटझाल्याने महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या अडचणीत भर पडली आहे


श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यात छत्तीसचा आकडा होता. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी सेना-भाजपची युती झाली. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार मावळची जागा शिवसेनेकडेच राहिली. बारणे यांनाच पुन्हा शिवसेनेची उमेदवारी मिळाली. यामुळे लक्ष्मण जगताप नाराज झाले. युती धर्माचे पालन करू, अशी हमी जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. तर, बारणे यांनी पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना बसविण्यासाठी मित्र पक्षाचे काम करावे, असे आवाहन केले होते. परंतु, आमदार जगताप खासदार बारणे यांच्या प्रचारात सहभागी झाले नव्हते. बारणे यांच्याबाबत भाजपमध्ये नाराजीचा सूर होता. त्या पार्श्वभूमीवर बारणे यांनी पुढाकार घेत जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. प्रचारात सक्रिय होण्याची विनंती त्यांनी जगताप यांना केली होती. तसंच जगताप यांच्यासोबतच्या मतभेदला पूर्णविराम दिल्याचे सांगितले होते. यानंतरही जगताप नाराज होतेशिवसेने नेते संजय राऊत, उपनेत्या निलम गोऱ्हे यांनी देखील जगताप यांची मनधरणी करीत प्रचारात सक्रिय होण्याची विनंती केली होती. त्यानंतरही जगताप प्रचारात सक्रिय नव्हते. ते तटस्थ होते

मावळमधील सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार जगताप यांची भेट घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा निरोप आहे. तो निरोप महाजन यांनी जगताप यांना सांगितला. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली होती. त्यानंतरही मतभेद कायम होते. रविवारी पुन्हा महाजन, बारणे आणि जगताप यांच्यात एकत्रित बैठक झाली. बारणे आणि जगताप यांच्यात मनोमिलन घडविण्यात महाजन यशस्वी झाले आहेत




0 comments:

Post a Comment