
काँग्रेसमध्ये प्रवेश केला . काँग्रेस भवनात दुपारी झालेल्या खास कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सचिन तावरे यांनी आपल्या
शेकडो समर्थकांसह फटाक्यांच्या निनादात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते, आमदार शरद रणपिसे, पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस -मित्र पक्ष आणि आघाडीचे उमेदवार मोहन जोशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, सचिन तावरे यांच्यासारखा उमदा, तरुण कार्यकर्ता काँग्रेसमध्ये परतल्याबद्द्दल आनंद व्यक्त केला. मोदी यांचे ढोंगी सरकार हटवून काँग्रेसला सर्वसामान्य माणसांचे राज्य आणावयाचे आहे त्यामुळेच या निवडणुकीत मोहन जोशी यांच्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मोहन जोशी यांनी प्रास्ताविक करताना शिवसेना नेते सचिन तावरे यांच्या काँग्रेस प्रवेशाची घोषणा करून त्यांचे काँग्रेसमध्ये सहर्ष स्वागत केले. याप्रसंगी आपल्या शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत भाषण करताना सचिन तावरे म्हणाले की, गेली काही वर्षे मी दुसऱ्या पक्षात जरी असलो तरी मी मनाने काँग्रेसमध्येच होतो. मी माझी वाट चुकलो होतो. एखादे मूल आईपासून जसे दुरावते आणि आई दिसली की लगेच ते तिला बिलगते तसे माझेही झाले होते. काँग्रेस ही माझी आई आहे म्हणून मी आज माझ्याच घरी आनंदाने परतलो आहे. काँग्रेस पक्षाचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी मी शपथ घेऊनच या पक्षात पुन्हा आलो आहे आणि प्रत्येक दिवसागणिक काँग्रेसची सर्वांगीण प्रगती झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे जाहीर करून तावरे म्हणाले, या लोकसभा निवडणुकीत मोहनदादा विजयी व्हावेत या एकाच प्रामाणिक इच्छेपोटी मी काँग्रेसमध्ये आलो आणि आता मतदानाला दिवस कमी असले तरी मी आणि माझे कार्यकर्ते रात्रंदिवस कठोर मेहनत करून मोहन जोशी यांचा विजय सार्थ करून दाखवू असे त्यांनी टाळ्यांच्या गजरात सांगितले.
त्यानंतर काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेतही सचिन तावरे यांनी आपल्या घरवापसीबाबत
आनंद व्यक्त करून काँग्रेस पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसून तो एक विचार आहे आणि हा विचार कोणी काहीही केले तरी मुळीच नष्ट होणार नाही असे ठामपणे सांगितले.
0 comments:
Post a Comment