हल्लीच्या मुलांच्या चेह-यावर
एक प्रकारचा उदास
भाव असतो. आपल्या
पिढीचं कोणत्या ना कोणत्या
गॅझेटसोबत किंवा स्मार्ट फोनसोबत
अतूट नातं निर्माण
झालंय. आपण या गॅझेटपासून
डिस्कनेक्ट व्हायलाच तयार नाही.
यामुळे झालंय असं की,
मानसिकदृष्ट्या एक प्रकारचं
डिप्रेशन सगळ्यांनाच जाणवतय. ब्रेनड्रेनदेखील
या सगळ्या घडामोडींत सातत्याने
होतंय. याच महत्त्वाच्या
मुद्द्यासाठी ‘राइट टू
डिस्कनेक्ट’ हे विधेयक
आणल्याचे सांगत, या विधेयकाच्या
माध्यमातून आपणा सर्वांना
एक ‘क्वॉलिटी लाइफ’ लाभावं हा त्यामागचा विचार असल्याचे
खा. सुप्रिया सुळे
भाडिपा ‘लोकमंच’वर स्पष्ट
केले.
उद्याचा समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी
उच्चशिक्षित तसेच अधिकाधिक
महिलांनी राजकारणात सहभागी होण्याची
आवश्यकता बोलून दाखवतानच खासदार
सुप्रिया सुळे यांनीस्थानिक
पातळीवर राबविलेल्या अनेक उपक्रम
व कामाचा आढावा
या वेळी घेतला
. विकासाचे मुद्दे हे नेहमीच
माझ्या अजेंड्यावर राहिले आहेत.
याच प्रश्नांना घेऊन
मी नेहमीजनतेसमोर गेली
असून बदल घडविण्यासाठी
आजच्या युवापिढीने राजकारणात सक्रीय
होणे गरजेच असल्याचं
त्या आवर्जून सांगतात.
राजकारण व समाजकारणा
विषयीचा नेमका दृष्टीकोन मांडतानाच
आपल्या आवडी-निवडी
व अनेक व्यक्तिगत
प्रश्नांची दिलखुलास उत्तरे सुप्रिया
सुळे यांनी भाडिपाच्या‘लोकमंच’मंचवर दिली. भाडिपाच्या ‘विषय
खोल’ या युट्यूब
चॅनलच्या माध्यमातून अभिनेता पुष्करराज
चिरपूटकर याने हा
संवाद साधला.
0 comments:
Post a Comment