Thursday, January 10, 2019

आसूड चित्रपटाचा दिमाखदार म्युझिक लाँच


अनेक सामाजिक विषय मराठी चित्रपटांतून अतिशय कौशल्याने हाताळले जातातशेतकऱ्यांच्या समस्या हा अतिशय  संवेदनशील विषय आहेत्या संदर्भात बेजबाबदार समाजव्यवस्थेला खडसाऊन प्रश्न विचारतत्यांचाविरुद्ध लढा देणाऱ्या एका तडफदार युवकाची कथा आसूड या आगामी चित्रपटात दाखवण्यात आली आहे

नुकताच या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा उत्साहात संपन्न झालाविशेष म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतले सुप्रसिद्ध संगीतकार ‘अनु मलिकयांनी ‘आसूडच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी संगीत दिले आहेअनेक मान्यवरांच्या उपस्थितीत राज्याचे गृहराज्यमंत्री मा.डॉ.रणजीत पाटील यांनी चित्रपटाचे संगीत अनावरण केलेचित्रपटाच्या ट्रेलरची आणि गीतांची झलक यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आलीयेत्या  फेब्रुवारीला आसूड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाला शुभेच्छा देतवास्तवादी विषय प्रभावीपणे मांडल्याबद्दल मा.डॉ.रणजित पाटील यांनी निर्माते डॉ.दीपक मोरे  दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर यांचे अभिनंदन केलेआसूडच्या निमित्ताने मराठी चित्रपटाला संगीत देणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होतीअसं सांगत अनु मलिक यांनी मराठीतल्या पदार्पणाबद्दल आनंद व्यक्त केलासर्वसामान्यांच्या जीवनाला भिडणारे प्रश्न मांडत वास्तवाची जाणीव करून देणे आज गरजेचे असून आसूडच्या माध्यमातून हा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर यांनी केले.

विक्रम गोखलेप्रदीप वेलणकरमाधव अभ्यंकरअनंत जोगदीपक शिर्केउपेंद्र दातेसंदेश जाधवकमलेश सावंतयांच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारे राणा जंगबहादूरअवतार गील हे नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेतत्यांच्यासोबतच अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही नवी आघाडीची जोडी या चित्रपटात झळकणार आहेतकथेच्या अनुषंगाने येणाऱ्या तीन गीतांना सोनू निगमआदर्श शिंददिव्या कुमार आणि अनमोल मलिक यांनी स्वरबद्ध केले आहे.

शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न तथा क्लिष्ट सरकारी यंत्रणा  राजकीय पाठबळ असलेले उद्योग जनसामान्यांचा कसा उपयोग करून घेतात याचे चित्रण आसूड या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहेगोविंद प्रोडक्शन प्रस्तुत आसूड चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून सहनिर्मिती विजय जाधव यांची आहेलेखन  दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहेकथापटकथा आणि संवाद निलेश रावसाहेब जळमकर  अमोल ताले यांचे आहेतछायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे फेब्रुवारीला आसूड प्रदर्शित होणार आहे.

0 comments:

Post a Comment