मानवी आयुष्य हे
सतत अनिश्चिततेच्या झुल्यावर
झुलत असतं. पुढच्या
वळणावर काय घडेल,
कोण भेटेल याचे
अंदाज आपण बांधू
शकत नाही. पण
या अनिश्चितेतही माणसाला
सुखावणारे, आनंद देणारे
अनेक योगायोग घडत
असतात. आयुष्यातला सगळ्यात सुंदर
योगायोग म्हणजे...प्रेम! कधीकधी
तर हा योगायोग
संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी देतो
आणि प्रेमाच्या रेशीमगाठींमध्ये
दोन जीवांना कायमच
बांधून टाकतो. प्रेमाचा असाच भन्नाट
योग जुळून आलेली
एक प्रेमकथा प्रेम
योगायोग या आगामी
मराठी चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर येऊ
घातली आहे. या
चित्रपटाचा मुहूर्त नुकताच दिमाखात
संपन्न झाला.
एकमेकांच्या
प्रेमात आकंठ बुडालेल्या
प्रेमिकांची कथा आपण
आजवर अनेकवेळा बघितली
आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने अपघाताने प्रेमात पडलेल्या
प्रेमवीरांची कथा पहायला मिळणार
आहे. अत्यंत फ्रेश,
कलरफुल आणि युथफुल असलेला हा चित्रपट प्रत्येकाला
आवडेल असा विश्वास दिग्दर्शक
नितीन कांबळे यांनी
यावेळी व्यक्त केला. हा वेगळा
विषय प्रेक्षकांना
नक्कीच आवडेल असं सांगताना मराठी
चित्रपट निर्मिती करीत असल्याचा
आनंद निर्माते
सुशील शर्मा यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
सीएमएस एन्टरटेन्मेंट निर्मिती संस्थेच्या प्रेम योगायोग या चित्रपटाची निर्मिती सुशील शर्मा यांची असून दिग्दर्शन नितीन कांबळे यांचे आहे. या चित्रपटात विक्रांत ठाकरे, मधुरा वैद्य या फ्रेश जोडीसोबत अरुण नलावडे, संजय मोने, शुभांगी लाटकर, तन्वी हेगडे सोबत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत सुशांत शेलार दिसणार आहे.
या चित्रपटाची कथा-पटकथा नितीन कांबळे यांची असून संवाद जन्मेजय पाटील यांचे आहेत. कलादिग्दर्शन महेंद्र राऊत तर छायांकन अनिकेत कारंजकर यांचे आहे. गीतकार स्वप्नील जाधव यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना राजेश सावंत, आनंद मेनन, तृप्ती चव्हाण यांचे संगीत लाभणार आहे. सहनिर्मिती मधुरा वैद्य यांची आहे.

0 comments:
Post a Comment