पुणे : विश्वविव्हा कॉन्सेप्ट इव्हॉल्वर्स प्रा. लिमिटेड आणि सिद (एस.आय.डी जन) फाऊंडेशन यांच्या वतीने भारतातील पहिलावहिला ‘गाथा- छत्रपती शिवाजी महाराजांची’ हा भव्यदिव्य सोहळा दिनांक १५ डिसेंबर २०१८ रोजी एन.डी.स्टुडियो, कर्जत येथे आयोजित करण्यात आला आहे. सौ. विमल कार्तिक सोमण(मुंबई) ह्या कार्यक्रमाच्या संयोजिका आहेत.यावेळी विनय वाघ उपस्थित होते.
शिवकालीन वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेत शिवतत्वे शिकून प्रत्यक्ष जीवनात त्याचा वापर कसा करावा याचं अनुभव समृद्ध शिक्षण देणारा आगळा वेगळा रोमांचकारी अनुभव म्हणजेच “गाथा- छत्रपती शिवाजी महाराजांची”... वीरगाथा, मोठे रंगमंच, किल्ले बनविण्याची प्रात्यक्षिके, मर्दानी खेळ(प्रात्यक्षिके), पोवाडे, गनिमी कावा प्रात्यक्षिक आणि अशा ब-याच गोष्टी ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहेत.
जेव्हा आपण इतरांना त्यांची स्वप्नं साकारण्यात मदत करतो, तेव्हा आपलीसुद्धा प्रगती होते,. आणि कुटुंब व समाज सक्षम आणि संपन्न होतो... उत्तम विश्वाची निर्मिती होते. ही निर्मिती म्हणजेच “गाथा- छत्रपती शिवाजी महाराज”. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाथा हे या कार्यक्रमाचे शीर्षक आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांविषयी जागरुकता निर्माण करणे, शासकीय शाळा दत्तक घेऊन त्यांचे आधुनिक गुरुकुलात परिवर्तन करणे, आपला वारसा (किल्ले/गडकोट) जतन करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट्ये असल्याचे कार्यक्रमाचे संयोजिका सौ. विमल कार्तिक सोमण यांनी म्हटले आहे, तसेच ह्या कार्यक्रमाला अंदाजे १ लाख इतक्या जास्त संख्येने प्रेक्षकवर्ग उपस्थित राहील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
0 comments:
Post a Comment