Saturday, November 3, 2018

पुण्याच्या हेमा कोटणीस यांना फिल्म पुरस्कार

हेमा कोटनीस, करण कोटणीस 
पुणे - पुण्यातील हेमा कोटनीस यांना नुकतेच प्रतिष्ठीत अश्या दादा साहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार २०१८ ने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या बेस्ट मिसेस इंडिया (एप्रीसीएशन अॉफ द क्रिएशन) मध्ये त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

पत्रकार संघात झालेल्या पत्रकार वार्तेत त्यांनी ही माहिती दिली. तसेच कोटणीस ग्रुपचे सीईओ करण कोटणीस यांना पर्यटन आणि आतिथ्य उद्योगसाठी बेस्ट अंत्रोप्रिन्युअर हा पुरस्कार मिळाला आहे. सतपाल महाराज (उत्तराखंडचे पर्यटन मंत्री) आणि संदीप मारवा (चित्रपट निर्माता) यांच्या  हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. सन्मान वितरणाच्या वेळी संगीतकार रफ्तार आणि अंजना ओम कश्यप (टीव्ही अॅंकर) यांच्यासह अनेक, महत्वाचे मान्यवर सेलीब्रीटीज, समाजसेवी आणि उद्योजक उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना हेमा कोटनीस म्हणाल्या, "हा प्रतिष्ठीत पुरस्कार  आणि गौरव मिळणे ही माझ्यासाठी मोठी गर्वाची आणी सौभाग्याची बाब आहे. मला आनंद आहे की या यशाने माझ्या कुटुंबाचा आणि शहराला अभिमान वाढविला आहे. माझ्या कुटुंबाचा आणि शुभचिंतकांच्या  पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते."

याआधी हेमा कोटनीस यांना एलिट मिसेस इंडिया 2016 ने देखील सन्मानित करण्यात आहे आहे. हेमा कोटनीस सौंदर्य जगतातील एक प्रसीद्ध नाव आहे. याचबरोबर त्या सामाजिक कर्यात देखील त्या अग्रेसर आहेत. गरजू मुलांना शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यास देखील त्या मदत करतात.

कोटणीस ग्रुपचे सीईओ करण कोटणीस यांना पर्यटन आणि आतिथ्य उद्योगसाठी दादासाहेब फाळके बेस्ट अंत्रोप्रिन्युअर हा पुरस्कार मिळाला आहे. यावेळी ते उपस्थित होते. आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले की, हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. मी माझ्या कुटुंबाचा व वडिलांचा आभारी आहे त्यांचा पाठिंबा माझ्यासाठी बहुमूल्य होता. यातुनच मला पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.

0 comments:

Post a Comment