पुणे: ‘द ऑफेंडर’ - स्टोरी ऑफ अ क्रिमिनल हा चित्रपट विविध मान्यवरांच्या उपस्थित प्रदर्शित झाला. अभिरुची सिटी प्राईड येथे प्रीमियर शो प्रसंगी रुपाली चाकणकर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी स्थायी समिती अध्यक्षविशाल तांबे, युवराज बेलदारे, एपीआय ज्योती गडकरी , अनिल डफल सहित चित्रपटातील कलाकार व निर्माते दिग्दर्शक उपस्थित होते.
चित्रपट क्षेत्रातील कोणतीही माहिती नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर सात जणांनी एक चित्रपट बनवावा, त्याचे सेन्सॉर बोर्डमध्ये कौतुक व्हावे आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर 4 अवॉर्ड्स मिळावेत; ही गोष्ट स्वप्नवत वाटते ना? पण हे स्वप्न नसून सत्य आहे.
द ऑफेंडर - स्टोरी ऑफ अ क्रिमीनल’ हा केवळ सात मित्रांच्या जिद्दीतून उभा राहिलेला थरारपट शुक्रवारी महाराष्ट्रातील थिएटर्समध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाची कथा डॉ. अमित कांबळे यांची असून, संकलन-दिग्दर्शन अर्जुन महाजन यांनी केले आहे.या चित्रपटात अर्जुन महाजन, डॉ. अमित (श्रीराम) कांबळे, दिप्ती इनामदार, अनिकेत सोनवणे, दिनेश पाटील, सोमनाथ जगताप, सुरज दहिरे, शिवाजी कापसे आणि लव्हनिस्ट यांनी भूमिका केल्या आहेत. सह-दिग्दर्शन सोमनाथ जगताप, छायाचित्रण अनिकेत सोनवणे, कला व ध्वनी विभाग दिनेश पाटील, सुरज दहिरे आणि शिवाजी कापसे यांनी सांभाळले आहे. दिप्ती इनामदार यांनी वेशभुषा सांभाळली आहे. अर्जुन महाजन यांनी या चित्रपटासाठी 2 गाणी लिहिली असून, आरोह-कृष्णा-सुजीत यांनी संगित दिले आहे. चित्रपटातील ‘अशी तु माझी होशील का’ हे गाणे चांगलेच गाजले असून, सामाजिक संदेश देणारे ‘घे भरारी’ हे गाणे देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
या चित्रपटाविषयी बोलताना या चित्रपटाचे दिग्दर्शक अर्जुन महाजन यांनी सांगितले, कोणताही नायक नसलेला केवळ खलनायकांची गोष्ट बनवणे आव्हानात्मक होते. या चित्रपटात कुणीही नायक नाही. सर्वच पात्रे खलनायक आहेत. त्यांना खलनायक बनवते ते त्यांची वैचारिक परिस्थिती. या चित्रपटातून आम्हाला व्यक्तीच गुन्हेगार असते, असे नव्हे तर कधी कधी परिस्थितीही गुन्हेगार असू शकते, हा संदेश द्यायचा होता. म्हणून ऑफेंडरची निर्मिती झाली.
या चित्रपटाचे लेखक डॉ. अमित कांबळे यांनी, मी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे मला गुन्हेगार आणि त्यांची सायकॉलॉजी यांची माहिती होती. त्यामुळे ऑफेंडर करताना मला काय लिहायचे आहे, याची पूर्ण कल्पना होती. मात्र, ती प्रत्यक्षात उतरवणे तितकेच आव्हानात्मक होते. कारण चित्रपट क्षेत्रातील कसलिही माहिती नसताना आम्ही केवळ सात जणांनी सोबत येऊन सिनेमा करणे, हे अतिशय आव्हानात्मक होते. या चित्रपटातून आम्ही खूप काही शिकलो, खूप चुकाही केल्या. पण आमच्या सर्वांच्या कष्टाचे फळ आता सर्वांच्या समोर येत आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे., असे सांगितले.
एक क्रिमीनल सायकॉलॉजिस्ट डॉ. नितीन नाईक, त्यांचा एक पेशंट शैलेश पिंगळे आणि डॉ. नाईक यांची पत्नी कला, यांच्या जीवनात घडणार्या विविध गोष्टींची एकत्र कथा या निमित्ताने मराठी सिनेमाच्या पडद्यावर आली आहे. सस्पेन्स थ्रीलर वर्गात मोडणारा हा सिनेमा 3 वेगवेगळ्या कथांना एकाचवेळी पडद्यावर दाखवतो, हे या सिनेमाचे बलस्थान आहे.
0 comments:
Post a Comment