Monday, June 25, 2018

६ जुलै रोजी प्रदर्शित होणार ‘सॉरी’


सॉरी हा इंग्रजी शब्द आज सर्वांच्या इतका अंगवळणी पडलाय की दिवसभरात असंख्य वेळा तो अनाहुतपणे ओठांवर येतो.आजच्या इंग्रजाळलेल्या प्रादेशिक भाषांमध्येही हा शब्द इतका रूळलाय की भविष्यात हा शब्द प्रत्येक प्रादेशिक भाषेतील मूळ शब्दाला मात देईल असं वाटतं. हाच सॉरी शब्द एखाद्याच्या आयुष्यात भिनला की काय होतं ते लवकरच रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणारआहे. वायडीजी फिल्म्सची निर्मिती असलेलासॉरीहा मराठी सिनेमा जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

वायडीजी बॅनरअंतर्गत निर्माते योगेश दत्तात्रय गोसावी यांनीसॉरीया चित्रपटाची निर्मिती केली असून लेखन, दिग्दर्शनआणि संकलन या सिनेमा निर्मितीच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्याही सांभाळल्या आहेत. प्रियदर्शना गोसावी या चित्रपटाच्यासहनिर्मात्या आहेत.

सॉरीही एका तरूण नाटयकर्माची कथा आहे. या सिनेमाची कथा सौरभ नावाच्या एका तरूणाभोवती गुंफण्यातआली आहे. हा तरूण नाटयलेखक आहे. नाटक लिहीता लिहीता त्याच्या जीवनात कशा नाटयमय घटना घडतात याचं चित्रणसॉरीयासिनेमात करण्यात आलं आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सात राज्यांमधील ४५ लोकेशन्सवर करण्यात आलं आहे. यात जामा मस्जिद,पणजीतील बासालिका ऑफ बोम्स चर्च, धर्मशालातील बौद्ध मंदिर, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं प्रसिद्ध वैजनाथ शंकर मंदिर,अमृतसरमधील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिर या पाच महत्वाच्या विविध धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचाही समावेश आहे.  निर्माता, दिग्दर्शक योगेश गोसावी यांनी आजच्या पिढीला डोळयांसमोर ठेवून हा सिनेमा बनवला आहे

सॉरी  या सिनेमाबाबत बोलताना गोसावी म्हणाले की, एखादी व्यक्ती कामाच्या आहारी गेली की त्याचेदुष्परिणाम भोगावेच लागतात. याच्या उलटअर्था बोलायचं तर एखादं काम मनापासून केलं की ते मनात भिनतं. यातून चांगल्याचीहीनिर्मिती होते आणि वाईटही घडतं. हाच धागा पकडूनसॉरीया सिनेमाची कथा लिहिण्यात आली आहे. या सिनेमाचा तरूण हाआजच्या पिढीचं प्रतिनिधीत्त्व करणारा आहे. मनाची घालमेल करणारा एक अवघड विषयसॉरीच्या निमित्ताने रूपेरी पडद्यावरमांडण्याचा प्रयत्न केला आहे. याला सर्व प्रकारच्या मनोरंजक मूल्यांची अचूक जोड देण्यात आली असल्याने कोणत्याही वयोगटातीलप्रेक्षकांना हा सिनेमा आवडेल अशी आशाही गोसावी यांनी व्यक्त केली.

 हा सिनेमा म्हणजे नवोदित असूनही काहीतरी धडाकेबाज करण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या कलाकारतंत्र् ज्ञानाचं टिमवर्कआहे. या सिनेमातील कलाकारही नवोदित असले तरी प्रचंड मेहनतीच्या बळावर त्यांनी लक्षवेधी अभिनय केला आहे. सौरभ चिरमुल्ला,सुलक्षणा राय, समृद्धी पाचे, पूजा मेश्राम, माही कपूर, चंद्रकांत बामणे, डॉ. संजीवकुमार पाटील आदी कलाकारांच्या या चित्रपटातभूमिका आहेत. माही कपूर या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या असून दिपीका अविनाश फत्तेपूरकर लाईन प्रोडयूसर आहेत.चित्रपटातील गीतांना श्रीरंग ढवळे  यांनी संगीत दिलं असून वेशभूषा माही कपूर यांची आहे. विनोद वाळुंज आणि विजय जोगदंडे यांनीकलादिग्दर्शन केलं असून छायांकनाची जबाबदारी हर्षद मुजुमदार यांनी सांभाळली आहे.

0 comments:

Post a Comment