Saturday, March 24, 2018

‘चला साहित्यिकांच्या गावाला’ उपक्रमातून लेखक-वाचक यांच्यातील बंध घट्ट होतील


पुणे : महाराष्ट्रातील वाचकप्रिय साहित्यिकांच्या गावी जाऊन कोकणातील निसर्गसौंदर्य साहित्यिकांच्या नजरेतून, त्यांच्या गावातून अनुभवण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. ‘चला साहित्यिकांच्या गावालाया अनोख्या उपक्रमातून कोकणची साहित्यसफर साहित्य रसिकांना घडणार आहे. शिवाय लेखक वाचक यांच्यातील बंध आणखी घट्ट होण्यासाठीचला साहित्यिकांच्या गावालाहा उपक्रम उपयुक्त ठरेल,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

विश्वकर्मा पब्लिकेशन्स आणि ऑफबीट डेस्टिनेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ते 9 मे 2018 या कालावधीतचला साहित्यिकांच्या गावालाहा सहल उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कवयित्री आश्लेषा महाजन, डॉ. गणेश राऊत, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संपादक मनोहर सोनवणे, ऑफबिट डेस्टिनेशनचे नितीन शास्त्री उपस्थित होते.

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, “आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी, लोकमान्य टिळक, मंगेश पाडगावकर, जयवंत दळवी, केशवसुत, आरती प्रभू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या महान साहित्यिकांच्या गावांना भेटी देऊन त्यांनी ज्या स्थितीत साहित्यनिर्मिती केली, ती वास्तू, तिथला परिसर प्रत्यक्षरित्या पाहण्याचा अनुभव या उपक्रमातून मिळणार आहे. कोकणातील अशा महान साहित्यिकांच्या साहित्याचे वाचन, विद्यमान साहित्यिकांच्या मैफली यामुळे लेखक-वाचक यांच्यातील बंध आणखी घट्टा होतील."

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “आधुनिक भारताच्या इतिहासात कोकणच्या सुपुत्रांनी आपल्या कर्तृत्वाने एक अढळ स्थान मिळविले आहे. या साहित्यिकांना भेटण्याचा जणू हा योग आहे.” नितीन शास्त्री म्हणाले, “या विशेष सहलीमध्ये आपल्याला कोकणातील निसर्गसौंदर्य बघायला मिळणार असून, त्यासोबत आपल्या लाडक्या साहित्यिकांची घरे, स्मारके, साहित्यास पूरक असलेले कोकणचे निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळणार आहे. या सहलीदरम्यान दिनांक 2 मे 2018 रोजी मुंबई-पुणे येथून प्रस्थान करण्यात येणार आहे

विशाल सोनी म्हणाले, “2013 मध्ये स्थापन झालेल्या विश्वकर्मानेसुजाण वाचकहेच आपले शक्तिस्थान मानून पुस्तकांबरोबर व्ही.पी. बुक क्लब, पुणे इंटरनॅशनल लिटरेचर फेस्टिव्हल राज्यभर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्याने अशा उपक्रमांचे सतत आयोजन करुन आपले साहित्यिक सामाजिक दायित्व पार पाडत आहे.”

अधिक  माहितीसाठी संपर्क  ऑफ बीट डेस्टिनेशन्स्, शॉप नं.1, रामचंद्र अपार्टमेंट्स, 586, शनिवार पेठ, नारायण पेठ पोलीसचौकीजवळ, पुणे-411030 या पत्त्यावर अथवा मोबा : 09422010467 / 09665526054  07276445600 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


0 comments:

Post a Comment