Monday, February 26, 2018

दुबईत रंगला ‘भय’ चित्रपटाचा शानदार प्रिमिअर

मराठी चित्रपटांनी सातासमुद्रापार झेप घेतल्याची गोष्ट आता नवीन राहिलेली नाहीमराठी मनोरंजन विश्वातील अनेक कार्यक्रम परदेशातसुद्धा होऊ लागले आहेतपरंतू मराठी चित्रपटाचा प्रिमिअर परदेशात होण्याची घटना विरळच मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘भय या आगामी मराठी चित्रपटाचा शानदार प्रिमिअर सोहळा नुकताच दुबईत संपन्न झाला.

चित्रपटातील कलाकारतंत्रज्ञ तसेच दुबईस्थित मराठीजनांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाशुक्रवार २३ फेब्रुवारीला दुबईच्या रॉक्सी थिएटर मध्ये संपन्न झालेल्या या शो ला दुबईच्या स्थानिक कलाकारांनी सुद्धा आवर्जून हजेरी लावली होती जी इंटरनॅशनलची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सचिन कटारनवरे यांनी केली असून दिग्दर्शनाची  संकलनाची जबाबदारी राहुल भातणकर यांनी सांभाळली आहे.

एका वेगळ्या विषयावर चित्रपट केल्याचं समाधान व्यक्त करतानाच उपस्थित सर्वांचे  आभार निर्माते सचिन कटारनवरे  कलाकारांनी याप्रसंगी व्यक्त केलेहा चित्रपट प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाल्याच्या भावना उपस्थित प्रेक्षकांनी यावेळी व्यक्त केल्या.

भीती काल्पनिक असली तरीत्या अनुषंगाने उलटसुलट विचार आपल्या मनात घोळत राहिल्याने आपलं उर्वरित शरीर सुद्धा या भीतीच्या दहशतीखाली येतेही भीती भविष्याशीच निगडित असल्यानेकाहीतरी अघटित घडणार असंच बरेचदा वाटत राहतंहा आपल्या कल्पनाशक्तीचा खेळ वेळीच सावरला नाही तर काय  होऊ शकतो हे दाखवून देणारा चित्रपट म्हणजे...भय.

अभिजीत खांडकेकरउदय टिकेकरसतीश राजवाडेस्मिता गोंदकरसंस्कृती बालगुडेविनीत शर्मासिद्धार्थ बोडकेशेखर शुक्लानुपूर दुधवाडकर,धनंजय मांद्रेकर आदि कलाकारांचा अभिनय ‘भयया चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळेल.

येत्या शुक्रवारी  मार्चला भय प्रदर्शित होणार आहे.1 comments:

  1. I think your post is very good, rather I would have liked to read a bit more about this topic because I think it is quite interesting. Fetal Medicine Services In Warangal So i look forward to see next updates.

    ReplyDelete