Wednesday, December 20, 2017

फक्त मराठीवर स्मृतीचित्रे

काळाच्या पडद्याआड गेलेल्या 
कलावंताना आदरांजली

आपल्या अभिनयाने सिनेजगतात आपली वेगळी छाप सोडणाऱ्या कलावंताना आदरांजली अर्पण करण्यासाठी त्यांचे खास चित्रपट फक्त मराठी चित्रपट वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. या कलावंतांच्या आठवणींना उजाळा देत ‘स्मृतीचित्रे च्या माध्यमातून  शनिवार २३ डिसेंबर ते शुक्रवार २९ डिसेंबर दरम्यान दररोज संध्याकाळी  ७.०० वा. हे चित्रपट पहाता येतील.

सदाशिव आमरापुरकर, कुलदीप पवार, विनय आपटे, रीमा लागू, सतीश तारे, अश्विनी एकबोटे या कलावंतानी रुपेरी पडद्याद्वारे रसिकजनांच्या मनात अढळस्थान निर्माण केलं आहे.  दुर्देवाने हे कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. स्मृतीचित्रे च्या माध्यमातून या कलावंताना आदरांजली देण्यासाठी फक्त मराठी वाहिनीने ही अनोखी संकल्पना आणल्याचे फक्त मराठी वाहिनीचे बिझनेस हेड श्याम मळेकर यांनी सांगितले.

प्रसारण - शनिवार २३ डिसेंबर ते शुक्रवार २९ डिसेंबर दरम्यान दररोज संध्याकाळी ७.०० वा.

0 comments:

Post a Comment