Friday, December 1, 2017

फक्त मराठीवर थरारपटांची मेजवानी

मराठीत रहस्यमय वा थरारपटांची मोठी परंपरा नाही. तरी काही दर्जेदार थरारपटांनी प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले आहे. अशाच काही निवडक थरारपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता यावा यासाठी फक्त मराठी चित्रपट वाहिनीने हे चित्रपट बघण्याची संधी ‘रसिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. 

शनिवार २ डिसेंबर ते शुक्रवार ८ डिसेंबर दरम्यान दररोज रात्री ९.३० वा.वैविध्यपूर्ण थरारपटांची पर्वणी रसिकांना फक्त मराठी चित्रपट वाहिनीवर घेता येणार आहे.

‘द शॅडो’, ‘७०२ दीक्षित’, ‘काळशेकर आहेत का?’, ‘गोंद्या मारतंय तंगडं’, ‘आभास’ या चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येईल. गूढ, रहस्य आणि चित्तथरारक चित्रपट बघण्याची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही मेजवानी देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फक्त मराठीचे बिझनेस हेड श्याम मळेकर यांनी सांगितले.
शनिवार २ डिसेंबर ते शुक्रवार ८ डिसेंबर दरम्यान रात्री ९.३० वा. प्रसारित होणाऱ्या या चित्रपटांचा थरार नक्की अनुभवा.

0 comments:

Post a Comment