Tuesday, November 14, 2017

शांतिलाल मुथ्था मानव सेवा पुरस्काराने सन्मान

14/11/2017

पुणे : शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. शांतिलाल मुथ्था यांना, यंदाचा राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार, महामहीम राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. बालदिनाचे औचित्य साधून दिनांक १४ नोव्हेंबर २०१७ रोजी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत आयोजित खास सोहळ्यात श्री. मुथ्था यांना सन्मानित करण्यात आले.

१९९३ च्या लातूर भूकंपात मोठ्या प्रमाणावर राहत कार्य करीत असताना तेथील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी १२०० भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुनर्वसन करण्यासाठी पुणे येथे आणले वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प उभा राहिला. या प्रकल्पातून लातूरची मुलं गेल्यानंतर मेळघाट ठाणे परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना या ठिकाणी सातत्याने आणले गेले. जमू-काश्मीर भूकंपातील ५०० विद्यार्थांना शिक्षणासाठी पुण्यात आणले. गेल्या तीन वर्षांपासून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ६०० मुला-मुलींचे शैक्षणिक पुनर्वसन यशस्वीपणे सुरु आहे. या विद्यार्थ्यांसाठी या प्रकल्पामध्येमेंटल हेल्थविभागाची स्थापना करण्यात आली आहे.

गुजरात भूकंपामध्ये त्या ठिकाणी चार महिने राहून ३६८ शाळा बांधून तत्कालीन पंतप्रधान आदरणीय श्री. अटलबिहारी वाजपयी यांच्या हस्ते गुजरात सरकारला सुपूर्द करण्यात आल्या. या माध्यमाने लाख २० हजार विद्यार्थांची तीन महिन्यात शाळेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली.

सन २००३ मध्ये भारतातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी मूल्य शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला. बीड जिल्हा परिषदेच्या ५०० शाळांतील ३५ हजार विद्यार्थ्यांबरोबर या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु झाली. सात वर्षात या कार्यक्रमाचे Impact Assessment, NCERT, Cambridge University  Oregon University यांच्या माध्यमाने करण्यात आले. यावरून विद्यार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडत असल्याचे निष्पन्न झाले. २०१७ मध्ये राज्य सरकारने मूल्यवर्धन कार्यक्रमाची व्याप्ती १०७ तालुक्यातील २० हजार शाळांमधून १० लाख विद्यार्थ्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आला. या कामी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन शासनाला विनामूल्य  सहकार्य करीत आहे

महाराष्ट्रा बरोबरच गोवा राज्याच्या सर्व शासकीय खाजगी शाळांमध्ये मूल्यवर्धन दोन वर्षांपासून सुरु आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशातील जिल्हा परिषदेच्या शाळांतून यशस्वी झालेला हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट गर्ल्स या उपक्रमांतर्गत ७३ हजार ६२५ मुलींचे सक्षमीकरण आत्तापर्यंत करण्यात आले आहे.


0 comments:

Post a Comment