Monday, October 23, 2017

मकरंद बनला मुंबईचा डबेवाला

मॅनेजमेंट गुरू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांनी जागतिक पातळीवरही आपल्या कार्याचा ठसा उमटवत जगासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. लंडनच्या प्रिन्सनेही ज्यांची दखल घेतली अशा मुंबईतील डबेवाल्यांनी आजवर भुकेल्या मुंबईकरांना वेळेवर जेवणाचा डबा पोहोचवून त्यांची क्षुधाशांती केली आहे. आता हाच डबेवाला मराठी सुपरस्टार मकरंद अनासपुरेंच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेविनोदी अभिनयासोबतच आपल्या धीरगंभीर भूमिकांद्वारे कधी हसवणाऱ्या तर कधी अंतर्मुख होऊन विचार करायला लावणाऱ्या अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत.Thank U विठ्ठला या आगामी मराठी चित्रपटात मकरंदमुंबईच्या डबेवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. एम.जी.के. प्रोडक्शनची प्रस्तुती तसेच गोवर्धन काळेगौरव काळे अंजली सिंग यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचेदिग्दर्शन देवेंद्र जाधव यांनी केलं असूनया चित्रपटाची कथादेखील त्यांचीच आहे. चित्रपटाचे सहनिर्माते एम.सलीम असून पटकथा ही त्यांचीच आहे नोव्हेंबरला ThankU विठ्ठला प्रदर्शित होणार आहे.

या भूमिकेच्या माध्यमातून डबेवाल्यांच्या अनोख्या विश्वाचा वेध घेतला जाणार आहे. एकसंध राहात सामाजिक धार्मिक उपक्रमांमध्येही हिरीरीने सहभागी होणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांचं प्रतिनिधीत्व करणारी भूमिका साकारताना आजवर केलेल्या कामापेक्षा काहीतरी खूप वेगळं केल्याचं समाधान लाभल्याची भावना मकरंद यांनी व्यक्त केली आहे. कंटाळवाणं दैनंदिन जीवन जगणाऱ्या मकरंदने साकारलेल्या डबेवाल्याला भगवान विठ्ठलाची साथ लाभल्यानंतर त्याच्यात काय बदल होतात आणि त्यानंतर त्याचा जीवनप्रवास कसा सुखकर होतो ते Thank U विठ्ठला  या चित्रपटात पाहायला मिळेल.

या चित्रपटात मकरंदच्या जोडीला महेश मांजरेकरदीपक शिर्केकमलेश सावंतस्मिता शेवाळेसुनील गोडबोलेप्रदीप पटवर्धनकिशोर चौघुलेजयवंत वाडकरयोगेश शिरसाट,अभिजीत चव्हाणमौसमी तोंडवळकरपूर्वी भावेतेजा देवकरयाकूब सय्यदअरुण घाडीगावकरअरुण टकलेसंतोष केवडेमिलिंद सफईसतिश सलागरेसंग्राम सरदेशमुख,राजेंद्र जाधवशैलेश पितांबरेअंतून घोडकेआनंद जोशीअमीर शेख, मनीषा राऊत, शिवा बालकलाकार वरद यांच्या भूमिका आहेत. संवाद एम.सलीम योगेश शिरसाट यांचे आहेतचित्रपटाला रोहन-रोहन यां संगीत लाभलं आहेछायांकन दिनेश सिंग तर संकलन अजय नाईक यांचं आहे. कलादिग्दर्शन अनिल गुंजाळ यांनी केलं असून वेशभूषा लक्ष्मण गोल्लार यांची आहे. ग्राफिक्स अरविंद हतनुरकर यांचं तर साऊंड इंजिनिअर विजय भोपे आहेत. नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते जितेंद्र कुलकर्णी आहेत.

नोव्हेंबरला ‘Thank U विठ्ठला’ प्रदर्शित होणार आहे.

0 comments:

Post a Comment