Monday, June 19, 2017

'अंड्या चा फंडा' मांडणार मैत्रीचा गूढ फंडा

दोन मित्र आणि त्यांची मैत्री...! या धाटणीचे अनेक सिनेमे आपल्याला पाहायला मिळतात. मैत्रीच्या याच विषयावर भाष्य करणाऱ्या सिनेमांत 'अंड्या चा फंडा' या आगामी चित्रपटाचादेखील समावेश होतो. अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टी निर्मित आणि प्रशांत पुजारी तसेच इंदिरा विश्वनाथ शेट्टी सहनिर्मित या सिनेमाचे संतोष शेट्टी यांनी दिग्दर्शन कथालेखन केले आहे. बालपणाच्या मैत्रीवर आधारित असलेल्या या सिनेमाचे पोस्टर पाहिले असता हा सिनेमा नक्कीच धम्माल आहे, हे लक्षात येते

या सिनेमाच्या ट्रेलरने देखील प्रसिद्धीचा उच्चांक गाठला आहे. मुंबईत झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी सिनेमाच्या संपूर्ण टीमसोबतच सी.आय.डी. फेम शिवाजी साटम, दयानंद शेट्टी आणि नरेंद्र गुप्ता या प्रसिद्ध तिकडींनी हजेरी लावली होती

दोन जिवलग मित्र आणि त्यांच्या कुरापती दाखवणारा ह्या सिनेमाचा ट्रेलर प्रत्येकाला आपल्या बालमित्राची आठवण करून देतोशिवाय अनेक वर्ष सिनेसृष्टीपासून दूर राहिलेली अभिनेत्री दीपा चौधरीदेखील या ट्रेलरमध्ये दिसून येते. विशेष म्हणजे यात तिची प्रमुख भूमिका असून, या चित्रपटामार्फत ती पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक करणार आहे. 'अंड्या चा फंडा' या सिनेमाचा ट्रेलर पाहताना हा सिनेमा एका गूढ कथेचा मागोवा घेत असल्याचे लक्षात येते. पण हे गूढ नेमके काय आहे ह्याचे स्पष्टीकरण मिळत नसल्याने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवण्यास 'अंड्या चा फंडा' या सिनेमाचा ट्रेलर पूर्णतः यशस्वी ठरत आहे.

तसेच तब्बल  या सिनेमाच्या ट्रेलरसोबतच 'डुबुक डुबुक' हे गाणेदेखील लोकांच्या पसंतीस पडत आहे. अंड्या आणि फंडयाच्या अनोख्या मैत्रीची झलक या गाण्यात पाहायला मिळते. लहानपणाची निरागस मैत्री आणि मैत्रीतील निस्वार्थ प्रेम दाखवणारे हे गाणे आहे. हर्षवर्धन वावरे यांनी गायलेल्या या गाण्याचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले असून, त्याचे अमितराज यांनी संगीतदिग्दर्शन केले आहे. त्याचप्रमाणे 'गोष्ट आता थांबली' हे गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजातील गाणे देखील मंत्रमुग्ध करण्याश यशस्वी ठरत आहे. क्षितीज पटवर्धन लिखित या गाण्याला अमितराज यांचे संगीत लाभले असून, भारताच्या गाण कोकिळा लता मंगेशकर यांच्या हस्ते या गाण्याचे अनावरणदेखील करण्यात आले. खुद्द लता दिदींनी या गाण्यासाठी आपला अनमोल वेळ देत, भरपूर शुभेच्छा देखील दिल्या आहेत.  

तसेच अंड्या आणि फंडयाच्या धम्माल जोडीमध्ये मृणाल जाधव ही चिमुरडीदेखील आपल्याला पाह्यला मिळणार असल्याकारणामुळे हे तिघेजण चित्रपटात काय कमाल करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या सिनेमाची पटकथा आणि संवाद अंबर हडप, गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिली आहे. जून महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात सुशांत शेलार, अरुण नलावडे, माधवी जुवेकर, रमेश वाणी आणि अनिल नगरकर हे कलाकारदेखील आपापल्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत

0 comments:

Post a Comment