Wednesday, May 24, 2017

रुपेरी पडद्यावर दोन हजाराची गुलाबी नोट

काही महिन्यांपूर्वीच चलनात आलेल्या दोन हजाराच्या नोटेने चांगलीच उत्सुकता निर्माण केली होती. मराठी सिनेसृष्टीतही दोन हजाराची गुलाबी नोट प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवायला सज्ज झाली आहे. ‘प्रेमा या आगामी मराठी चित्रपटातीलमी गुलाबी नोट दोन हजाराचीया हटके आयटम सॉंगचे चित्रीकरण नुकतेच  संपन्न झाले. नृत्यतारका मानसी नाईक हिच्या मोहक अदा सिनेरसिकांना पहायला मिळणार आहेत.

मार्कंडेय फिल्म प्रस्तुत,रमेश गुर्रम निर्मित आणि सदानंद इप्पकायल दिग्दर्शित प्रेमा या आगामी चित्रपटातील गाणी शेखर आनंदे यांनी लिहीली असून त्यांनीच ती संगीतबद्ध केली आहेत. अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि रेश्मा सोनावणे यांनी गाणी गायली असून नृत्यदिग्दर्शन सिद्धेश पै यांनी केले आहे

 नयन निरवळ, शिल्पा ठाकरे, सचिन बत्तुल या कलाकारांनी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेतचलनातील दोन हजाराची नोट लोकांनी जशी स्वीकारली तशीच चंदेरी पडद्यावरची ही दोन हजाराची गुलाबी नोट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास चित्रपटाच्या टीम ने व्यक्त केला.

1 comments: