Wednesday, May 24, 2017


परी हूँ मैं चित्रपटाचा मुहूर्त

योगायतन समूहाचे मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण

मराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण चांगल्या विषयाची निवड निर्माते दिग्दर्शक जाणीवपूर्वक करू लागले आहेत. मराठी प्रेक्षक वेगळ्या विषयांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतो. ही बाब लक्षात घेऊन योगायतन फिल्मस् ने वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा परी हूँ मैं हा हटके मराठी सिनेमा प्रेक्षकांसाठी आणला आहे

बांधकाम, पायाभूत सुविधा यांसह विविध उद्योगक्षेत्रात आपला लक्षणीय ठसा उमटवणाऱ्या योगायतन समूहाने या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण केले आहे. या सिनेमाचा मुहूर्तयोगायतनग्रुप चे चेअरमन आणि चित्रपटाचे निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि संचालिका शीला राजेंद्र सिंह यांच्या हस्ते नुकताच दिमाखात संपन्न झाला. कलाकार तंत्रज्ञ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी उपस्थितीत होते.

रोहित शिलवंत दिग्दर्शित परी हूँ मैं या चित्रपटात एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयापर्यंतचा पॅशनेबल प्रवास मांडण्यात आला आहे. नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी हे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाचा वेगळा विषय प्रत्येकाला नक्कीच भावेल असा विश्वास निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केला.

चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची आहे. चित्रपटाचे छायांकन रोहन मडकईकर करणार असून संकलन ह्रीतेकेश मामदापूर यांचे असणार आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत सांभाळणार आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्युसर कुणाल मेहता आहेत. संगीत समीर साप्तीस्कर यांचे आहे. सहनिर्माता संजय गुजर असून कार्यकारी निर्माते भाविक पटेल आहेत. प्रोजेक्ट हेड भूषण सावळे आहेत.


0 comments:

Post a Comment