पुणे, 24 मे 2017 : तनिष्क या भारताच्या
सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक
लोकप्रिय ज्वेलरी ब्रँडतर्फे रिवाह
हा आपला नवीन
उप-ब्रँड बाजारात
दाखल होत असल्याची
घोषणा केली आहे.
या आपल्या दुसर्या उप-ब्रँडच्या माध्यमातून तनिष्कने
हस्तकलेत अत्यंत आकर्षक स्वरुपातील
कारागिरी केलेल्या लग्नातील दागिन्यांची
विस्तृत श्रेणी देशभरातील सर्व
वधुंकरिता उपलब्ध केली आहे.
बेंगलोर येथील कंपनीच्या डिझाईन
टीमने या श्रेणीची
संकल्पना आणि डिझाईन
विकसित केले आहे.
आपल्या या खास
दिवशी प्रत्येक वधू
ही सर्व सर्वोत्कृष्ट
गोष्टींची हकदार आहे, असा
तनिष्कचा विश्वास असून त्याचसाठी
उन्हाळ्यापूर्वी येणार्या लग्नसराईसाठी
या नव्या श्रेणीचे
पदार्पण केले आहे.
तनिष्कच्या मोठ्या आणि विस्तारणार्या रिटेल
नेटवर्कच्या माध्यमातून सध्या 205 पेक्षा
अधिक दुकानांमधून रिवाह
कलेक्शन उपलब्ध आहे. रिवाह
कलेक्शनमधील दागिन्यांची किंमत 1 लाख
रुपयांपासून पुढे आहे.
तनिष्कची परंपरा आणि कारागिरीचा
-रिवाज आणि लग्नाचे
पवित्र बंधन-विवाह
यांचा संयोग म्हणजेच
रिवाह. देशाच्या कोणत्याही ठिकाणावरील
वधू असली तरी
तिच्यासाठी लग्नसमारंभात दागिने हा अत्यंत
महत्वाचा घटक असतो.
रिवाहमध्ये सोने, हिरे, कुंदन
व पोल्की यापासून
बनविलेल्या दागिन्यांचा समावेश असून
देशभरातील कोणत्याही समुदायातील वधुला
आवश्यक सर्व दागिने
येथे उपलब्ध आहेत.
पंजाबी वधुसाठी हातफुल असेल
किंवा कन्नड वधुसाठी
कमरबंद असेल, रिवाह मधील
प्रत्येक दागिना हा एक
उत्कृष्ट नमुना आहे. रिवाह
श्रेणी सादर करुन
तनिष्कने भारतीय वधुसाठी एक
विशेष नजराणा पेश
केला आहे.
तनिष्कतर्फे
पदार्पण होणार्या नव्या
उप-ब्रँडबाबत बोलताना,
टायटन कंपनी लिमिटेडच्या
ज्वेलरी विभागाचे रिटेल व
मार्केटींग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष
संदीप कुल्हाली यानी
सांगितले की,भारतातील
लग्न समारंभाला वाहिलेला
रिवाह हा आमचा
उप-ब्रँड सादर
होताना आम्हाला खूप आनंद
होत आहे. वर्षानुवर्षे
या श्रेणीमध्ये मोठी
संधी उपलब्ध असल्याचे
आपण पाहतो आहोत
आणि म्हणूनच एक
स्वतंत्र अस्तित्व असणारा आमचा
हा वेडींग ज्वेलरी
ब्रँड दाखल करण्याची
ही अगदी योग्य
वेळ आहे, असे
आम्हाला वाटते.
रिवाहमध्ये देशभरातील
13 विवाह समुदायांसाठी दागिन्यांची सुरुवात करीत
असून त्यांची संस्कृती
साजरी करीत आहोत.
या नवीन ब्रँडमध्ये
श्रेणीतील सर्वोत्कृष्ट दागिन्यांचा समावेश असून
फक्त वधूसाठी नव्हे
तर तनिष्कसाठी सुध्दा
ती नव्या दागिन्यांची
सुरुवात आहे.
0 comments:
Post a Comment