Wednesday, January 11, 2017

झी युवावर नवीन चेहऱ्यांना संधी...

11 January 2017

कुठल्याही क्षेत्रात नव्या गोष्टी येणं ही नेहमीच एक सकारात्मक गोष्ट असते. कलाकृतीचं जगही त्याला अपवाद नाही. नवीन टॅलेंट नेहमीच एक फ्रेशनेस घेऊन येतात, प्रचंड एनर्जी घेऊन येतात, नवीन आयडियाज घेऊन येतात. झी युवा सारखी यूथफूल वाहिनी, जिचे ब्रीद वाक्यच आहे, "नवे पर्व युवा सर्व " हि सातत्याने अशा नव्या टॅलेंटच्या शोधात आहे.

झी युवावरील सर्वच मालिकांमध्ये, झी युवा ने अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. झी युवाचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम "युवागिरी " नवीन रूपात नवीन थाटात येत आहे आणि त्याकरिता झी युवा वाहिनी एका नवीन अँकर जोडीच्या शोधात आहे. त्यासाठी झी युवाने " युवागिरी अँकर हंट " हि स्पर्धा आयोजित केली आहे.

जर तुम्हाला खरंच अभिनय क्षेत्राकडे वळायचं आहे. भरपूर मेहनत घेऊन एंटरटेन्टमेंटच्या दुनियेत स्वतःच नाव कमवायचं आहे. कलाकारांची दुनिया तुम्हाला आकर्षित करत आहे, तर झी युवा वाहिनी तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन आली आहेझी युवानेयुवागिरी अँकर हंट" हि स्पर्धा १० जानेवारीपासून आयोजित केली आहे. या अँकर हंट च्या ऑडिशन्स नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे ऑनलाईन ऑडिशन द्वारे होतील. या ऑडिशन मध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी स्वतःच्या अँकरिंग चे व्हिडिओ बनवताना, स्वतःचे नाव आणि शहर सांगून अँकरिंग व्हिडिओ शूट करावा आणि आपल्या अँकरिंग

व्हिडिओची अनलिस्टेड (प्रायव्हेट) यूट्यूब लिंक खालील तीन प्रकारे झी युवापर्यंत पोहचवावी 

)स्पर्धक झी युवाच्या व्हाट्सअँप नंबर ८२९११००९६५ वर अँकरिंग व्हिडिओची अनलिस्टेड (प्रायव्हेट) यूट्यूब लिंक किंवा डायरेक्ट व्हिडीओ पाठवु शकतात.

)स्पर्धक झी युवाची वेबसाईट http://www.zeeyuva.com/yuvagiri-anchor-hunt/या लिंक वर अँकरिंग अनलिस्टेड (प्रायव्हेट) व्हिडिओची यूट्यूब लिंक अपलोड करू शकतात.

)स्पर्धक झी युवाच्या फेसबुक पेज  https://www.facebook.com/ZeeYuva/ च्या मेसेज मध्ये अँकरिंग व्हिडिओची अनलिस्टेड (प्रायव्हेट) यूट्यूब लिंक अपलोड करू शकतात.

या ऑडिशन मध्ये निवडलेल्या त्या दोन लकी स्पर्धकांनाझी युवा या वाहिनीवर "युवागिरीहायूथफूल शो होस्ट करायला मिळणार आहेतेव्हा वेळ  घालवता स्वतःचा अँकरिंग चा व्हिडीओ
बनवून झी युवाला पाठवा

0 comments:

Post a Comment