Wednesday, February 1, 2023

मिस चार्म मध्ये सताक्षी करणार भारताचे प्रतिनिधित्व

2/2/23

पुणे - व्हिएतनामचे मिस चार्म ऑर्गेनाइजेशन १६ फेब्रुवारी रोजी होणार्या मिस चार्म २०२३ स्पर्धेसाठी सज्ज आहे, हो ची मिन्ह सिटी येथे या स्पर्धेचे आयोजन होणार असुन, जगभरातील सौंदर्यवती या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होतील. या ब्यूटी पेजंट द्वारे जगातील विविध देशांतील अनोख्या प्रतिभा संप्पन महीला प्रतिनिधी जगासमोर येतील आणि, त्या सौंदर्य तसेच त्यांची संस्कृती आणि शैक्षणिक पार्श्वभूमीच्या जोरावर आप-आपल्या देशांचे प्रतिनिधित्व करतील.

मिस चार्मसाठी २०२३ साठी २५ वर्षीय सताक्षी भानोट व्हिएतनाममधील या मेगा इव्हेंटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार असून ती १७० सेंमी उंच, सौंदर्य क्षेत्रातील अनुभवी आणि आत्मविश्वासु युवती आहे. तिने एमआयटी, पुणे येथून इंटरनॅशनल बिजनेसमध्ये पदवी आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची पदव्युत्तर डिग्री देखील घेतली आहे. ती बिलियनेअर माइंडसेट वॉल २ या पुस्तकाची सह-लेखीका देखील आहे. सताक्षी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करणे हा मोठा सन्मान आणि जबाबदारी समजते. ज्यासाठी तिने कठोर प्रशिक्षण घेतले आहे आणि तीचा विश्वास आहे की स्टेजवर पर्फोर्मन्स देताना भारतीयांना तीचा अभिमान वाटावा यासाठी ती सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल.

ती म्हणते मेहनत आणि समर्पण स्पर्धेसाठी आवश्यक आहे, तसेच सौंदर्य स्पर्धा म्हणजे केवळ मंचावर चांगले दिसने नव्हे तर एकुण व्यक्तिमत्व सक्षम असणे देखील यासाठी आवश्यक आहे. ब्यूटी क्वीन, मिस चार्म इंडिया २०२३ बनने तिचे सर्वात मोठे स्वप्न आहे. सताक्षी स्वत: ला एक निश्चिंत, आनंदी, सकारात्मक आणि उत्कट स्त्री समजते, जी आयुष्यातील नवीन आव्हाने स्वीकारण्यास तयार आहे आणि मिस चार्म २०२३ चे व्यासपीठ त्यापैकी एक आहे.

साताक्षीसाठी मिशेल ओबामा प्रेरणास्थान आहेत. त्या अत्यंत सकारात्मक महिला आहेत आणि त्यांनी एक व्यक्ती म्हणून स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सताक्षी म्हणते कि तिच्या आजूबाजूच्या लोकांनी तीला नेहमीच समर्थन दिली आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित केले, विशेषत: टियारा पेजंट ट्रेनिंग स्टुडिओची संस्थापीका व तिची स्पर्धक प्रशिक्षिका रितिका रामत्री, मॉडेलिंग आणि सौंदर्य स्पर्धांच्या दुनियेत सताक्षी नवीन नाही. विविध डिझाइनर आणि ब्रँडसाठी स्टेजवर पर्फोमन्स बरोबरच, ती कॅम्पस प्रिन्सेस २०१९ आणि जीएसआय सुपरमॉडेल इंडियामध्ये नॅशनल फायनलिस्ट होती, याशिवाय ती फेमिना मिस इंडिया नॉर्थ फायनलीस्ट देखील होती आणि किको मिलानो या ब्रॅंडची इंटरनॅशनल फेस होती. तिच्या अथक प्रयत्नांमुळे व परिश्रमामुळेच आता ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न साकार करणार आहे.

सताक्षी दृढ, आत्मविश्वास असणारी एक सुंदर युवती आहे, ती देशातील युवतींना सांगू इच्छिते की ब्यूटी क्विन बणण्याची इच्छा बाळगणार्या किंवा आयुष्यात कोणत्याही गोष्टीची इच्छा बाळगणाऱ्या तरूणींनी स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि कठोर परिश्रम घेतले पाहिजेत, ती त्यांना त्यांच्या प्रयत्नात साथ देण्यास उत्सुक आहे. रॉबिन हूड आर्मीमध्ये राहून तिने अरुणाचल प्रदेशातील एका अनाथाश्रमास देखील मदत केली आहे.

आधानचे जॉबस्रोत रीक्रूटमेंट प्लॅटफाॅर्म बाजारात सादर

 2/2/23

पुणे: आधान सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ने जॉबस्रोत हे रिक्रूटमेन्ट प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे, जे फ्रीलान्स रिक्रूटर्सना मदत करण्यासाठी बनवले गेलेले एक प्रगत तंत्रज्ञान आहे. या प्लॅटफॉर्म वर विविध साधने आणि संसाधने असुन ही नियुक्तीकर्त्यांना एक आदर्श उमेदवार शोधण्यात मदत करतात. याचा फायदा नियोक्त्यांना होतो आणि त्यांना सोप्या पद्धत्तीने सीव्हीची गुणवत्ता आणि प्रमाण मिळते.

हे प्लॅटफॉर्म उमेदवार शोधण्याच्या प्रक्रियेचे डिजिटायझेशन करते आणि फ्रीलांसर आणि रिक्रूटर्सना जोडते ज्यामुळे दोघांनाही याचे अनेक फायदे मिळतात. डॅशबोर्ड-बेस अपडेट्स आणि ४०% इनकम वाटपाच्या या पारदर्शक यंत्रणेमुळे ही उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवण्याची संधीच आहे.

हे प्लॅटफॉर्म गेल्या महिन्यात लाँच करण्यात आला असुन त्याला रिक्रूटर्सकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याव्यतिरिक्त, या प्लॅटफॉर्म मुळे ग्राहकांना सर्व उद्योगांमध्ये व्यापक पोहोच मिळते. जॉबस्रोत कडे संपूर्ण भारतभरातील स्वतंत्र रिक्रूटर्स आहेत, ज्यामुळे क्लायंट त्यांच्या उद्योगातील तज्ञ रिक्रूटर शोधू शकतात. विशेषतः छोट्या आणि मध्यम व्यवसायांसाठी हे फायदेशीर ठरू शकते. ज्यांच्याकडे देशव्यापी शोधासाठी संसाधने नसतील त्यांना हे निश्चीतच फायद्याचे ठरेल.

अधान सोल्युशन्सच्या एमडी भावना उदेरनानी म्हणतात की, नोकरी शोध प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आलेले हे व्यासपीठ खरोखरच क्रांतिकारक आहे. ही ६ टेक वैशिष्ट्येव जॉबस्रोतसाठी स्केल्सयुक्त, वापरण्यास सोपी आणि सुरक्षित आहेत. एक एचआर प्रोफेशनल म्हणून, माझा विश्वास आहे की जॉ जॉबस्रोत हे एक बहुमूल्य साधन आहे जे नोकरीच्या बाजारपेठेत वास्तविक बदल घडवू शकते.

टॉप जॉबस्रोत टेकची काही वैशिष्ट्ये:-

१. इंटुईटीव्ह डॅशबोर्ड - हा डॅशबोर्ड तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्याा तंत्रज्ञानामध्ये वेब डेव्हलपमेंट लॅग्वेज व फ्रेमवर्क जसे की रिऍक्ट, बूटस्ट्रॅप, एसएएसएस, डेटा व्हिज्युअलायझेशन, लायब्ररी, टूल्स आणि डेटाबेस व डेटा मॅनेजमेन्ट सिस्टम समाविष्ट आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने चार्ट, ग्राप्स आणि इतर प्रकारच्या व्हिज्युअलायझेशनच्या स्वरूपात डेटा किंवा माहितीचे व्हिज्युअलाईजेशन
केले जाते आणि वापरकर्त्यांना डेटाशी जोडले जाण्याची संधी मिळते.

 २. ऑटो इनव्हॉइस जनरेशन - पायथन सारख्या प्रोग्रामिंग भाषांचा वापर कस्टम कोड लिहिण्यासाठी केला जातो. याचसोबत विशिष्ट व्यवसाय, नियम आणि डेटा इनपुटवर आधारित इनव्हॉइस तयार केले जातात. कस्टमाईजेबल टेम्पलेट, ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन व टोटल, पेमेंट गेटवे व अकाउंटिंग सिस्टमचे फायदे यात समाविष्ट आहेत.

३.ऑटोमॅटिक अॅग्रीमेट जनरेशन - येथे नॅचरल लॅग्वेज प्रोसेसिंग (NLP) वापरली जाते. जे एक प्रकारचे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आहे. कम्प्युटरला मानवी भाषा समजण्यासाठी, त्याचा अर्थ काढण्यासाठी आणि निर्माण करण्याची अनुमती देण्यासाठी, स्टक्चर डेटा इनपुट्स घेण्यासाठी ,नैसर्गिक भाषेत दस्तऐवज तयार करण्यासाठी येथे एनएलपीचा वापर होतो.

४ डुप्लीकेसी रिमूव्हल - हे सॉफ्टवेअर हॅश फंक्शन्स वापरते , अल्गोरिदम इनपुट घेतात (जसे की मजकूराची स्ट्रिंग किंवा फाइल) आणि "हॅश" निश्चित आकाराचे आउटपुट तयार करते. थोडक्यात, फ्रीलांसर या प्लॅटफॉर्मवर आधीच सबमिट केलेल्या उमेदवारांचे प्रोफाइल पुन्हा सबमिट करू शकत नाहीत ज्यामुळे डुप्लिकेट सीव्हीची शक्यता राहत नाही आणि फ्रीलांसर साठी संभ्रमाची स्थीती राहत नाही.

5. सिक्युरिटी - जॉबस्रोत वेब ऍप्लिकेशन फायरवॉल (डब्ल्यूएएफ) वापरते. येथे फ्रीलांसर रिक्रूटर्सला डेटाचे संरक्षण करणार्यास वेब ऍप्लिकेशनच्या अभेद्यतेचा फायदा मिळतो. याचे ट्रॅफिक फिल्टर संशयीत डेटापासुन सुरक्षा देते. येथे GoDaddy द्वारे SSL/TLS एन्क्रिप्शन वापरले जाते ज्यामुळे कनेक्शनवर पाठवलेल्या संवेदनशील माहितीचे संरक्षण करता येते. हे प्लॅटफॉर्म फ्रीलांसर च्या वैयक्तिक माहितीस सुरक्षित ठेऊन त्यांना निश्चिंतपणे कामाची हामी देते. याचबरोबर फिशिंग आणि ऑनलाइन सायबर हल्ल्यांपासून फ्रीलांसरचे संरक्षण करते.

 ६. क्लाउड-बेस - जॉबस्रोत एनजीआयएनएक्स वर तयार केलेले एडब्ल्यूएस क्लाउड प्लॅटफॉर्मवर आहे - हे सर्वात वेगवान वेब सर्व्हर. कम्प्युटरींग पावर, स्केलेबिलिटी, विश्वासार्हता , सुरक्षित डेटाबेस स्टोरेजसह इफ्रास्टक्चर आणि सॉफ्टवेअर सेवांच्या संयोजनाच्या विविध सेवा देते.

Thursday, January 26, 2023

एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनचे पुष्प प्रदर्शन सुरू

27/1/23

पुणे  : एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे २५ ते २९ जानेवारी दरम्यान पुष्प प्रदर्शनाचे आयोजन कारण्यात आले असून प्रदर्शनाचे उद्घाोटन आज खासदार श्रीनिवास पाटील यांच्या 
हस्ते करण्यात आले.

या वेळी संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे आणि विश्वस्त अनुपमा बर्वे ,श्रीनाथ कवडे ,सुमन किलोस्कर , प्रशांत काळे , प्रशांत चव्हाण ,आदी मान्यवर उपस्थित होते . ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया  या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे..  या वर्षीचे प्रदर्शन संस्थेचे मा. अध्यक्ष स्व. श्री. राहुल बजाज यांच्या स्मृतीस अर्पित करीत आहोत.

पुष्पप्रदर्शन २६ ते २९ जानेवारी पर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. प्रदर्शनात कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीममधून विक्रेते येणार आहेत. यामध्ये नर्सरी, शेतीची अवजारे, खते, कुंड्या, बागकामाचे साहित्य, खाद्यपदार्थ असे विविध स्टॉल असणार आहेत.

यावर्षी जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साई वृक्षांचे विविध प्रकार या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. विविध झाडे, वेली नटलेले एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने फुललेली बहरलेले असून लवकरच पुणेकरांना यांचा आनंद घेता येणार आहे. संस्थेमार्फत अगदी १०० वर्षापूर्वीपासून जनमानसात निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने पुष्पप्रदर्शने भरविली जात होती. मध्ये काही कालावधीचा खंड वगळता संस्थेने आजवर ती परंपरा कायम ठेवलेली आहे. बागेमध्ये पुन्हा नव्याने पुष्पप्रदर्शन भरविण्यास जानेवारी, १९९८ सालापासून सुरूवात झाली. अगदी पहिल्या प्रदर्शनापासून पुणेकरांनी यास उस्फूर्त प्रतिसाद दिला.

पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इ. ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्पप्रदर्शना मध्ये सहभागी होण्याकरिता येत असतात.या पुष्पप्रदर्शनाचे वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बागेच्या प्रतिकृती इ. गोष्टींचा समावेश असतो.

पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी खास मुलांसाठी चित्रकला व हस्ताक्षर लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात येतात. या स्पर्धेस निरनिराळ्या शाळांमधून सुमारे १००० विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यंदाच्या वर्षी देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व हस्ताक्षर लेखन स्पर्धा रविवार दि. २२ जाने. २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

पुष्पप्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना. यंदाच्या वर्षीदेखील) जपानी पध्दतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती या पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील, एरवी केवळ पानांनी, वेलींनी व हिरवाईने नटलेली एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने फुललेली पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

‘शंभरावं स्थळ’ला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद

27/1/2023

पुणे - मुलं मोठी झाली की आई वडिलांना एकच टेन्शन असतं, की एकदा हिचं किंवा त्याचं लग्न झालं की आपण मोकळे.. म्हणूनच वयात आलेल्या मुलांच्या पाठीमागे आई-वडिलांनी लग्नाचा भुंगा सोडलेला असतो... या भुंग्याच्या तावडीतून सुटण्यासाठी बिचारी मुलं धडपडत असतात आणि शेवटी लग्न करण्यासाठी होकार दिला जातो... मग सुरु होतो... स्थळं पाहण्याचा थरारक खेळ.... यातूनच उलगडत जाते अनुजा आणि चिन्मय या दोघांची गोष्ट म्हणजे, 'शंभरावं स्थळ'....!!

एक महत्वाकांक्षी, यशस्वी,  आत्मविश्वासाने परिपूर्ण असणारी अनुजा प्रत्येक स्थळाला नकार देते आहे, याचं नक्की कारण काय ? एक शांत, समंजस मुलगा चिन्मय एका स्थळाला नकार देतो, मग एक मुलगी थेट त्याच्यात घरी जावून नकाराचं कारण विचारते...!!  यात अनुजा, चिन्मय आणि यांच्या कुटुंबात रंगलेली गोष्ट म्हणजे शंभरावं स्थळशॉर्टफिल्म्स स्वरुपात मांडण्यात आली आहे.

या शॉर्टफिल्मचे लेखन आणि दिग्दर्शन बन्सीधर किंकर यांनी केले आहे. या शॉर्टफिल्मची निर्मिती 'आदि निर्मिती' आणि एसएनसी लँडमार्क यांच्यावतीने करण्यात आले आहे.  एसएनसी लँडमार्कचे गौरव शहा हे निर्माते आहेत.

ही शॉर्टफिल्म नवीन वर्षात १५ जानेवारी रोजी आदी निर्मितीच्या युट्युब चॅनलवरून प्रसिद्ध करण्यात आली. या फिल्मला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. केवळ दहाच दिवसात साडेतीन लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी पाहिली असल्याने ही फिल्म चांगलीच व्हायरल होत आहे.

कोणतेही पेड प्रमोशनन करता केवळ फिल्मचा आशय, मांडणी, कलाकारांचा अभिनय, निर्मिती मुल्ये याच्या जोरावर या शॉर्टफिल्मला ऑनलाईन प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सुमारे ३५ देशातील लोकांनी ही फिल्म पाहिली असून फिल्म पहाणारे रसिकच ही फिल्म इतरांनी पहावी यासाठी एकमेकाना रेफरल्सदेत आहेत, हे निर्माता म्हणून माझ्यासाखी खूप सुखद आणि गोड धक्का असल्याचे निर्माते एसएनसी लँडमार्कच्याचे गौरव शहा यांनी बोलताना सांगितले.

मुळात शॉर्टफिल्मच्या निमित्ताने आपण केलेले काम लोकांना आवडत आहे, हे कोणत्याही लेखकासाठी आणि दिग्दर्शकासाठी महत्वाचे असते. शॉर्टफिल्म पाहिल्यानंतर अनेकांनी आपली प्रतिक्रिया आमच्या पर्यंत पोचविली आहे, जी आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. चिन्मय आणि दीप्ती या दोघांनी आपली भूमिका वठविताना प्रचंड मेहनत घेतली, असे लेखक व दिग्दर्शक बन्सीधर किंकर यांनी बोलताना सांगितले.

Wednesday, January 18, 2023

सकल हिंदू समाजकडून रविवारी हिंदू जनआक्रोश मोर्चा

पुणे, ता. १८ - सकल हिंदू समाजच्या वतीने येत्या रविवारी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे धीरज घाटे, श्री. शंभू चरित्राचे अभ्यासक नीलेश भिसे, मातृशक्तीच्या नलिनी वायाळ, विश्‍व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, शिव समर्थ प्रतिष्ठानचे दीपक नागपुरे, शिव प्रतिष्ठानचे संजय पासलकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पवळे म्हणाले, 'या मोर्चाची गेल्या एक महिन्यापासून तयारी सुरू आहे. हा मोर्चा अभूतपूर्व असा होईल. शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चात महिला आणि युवकांचा लक्षणीय सहभाग असेल. सकल हिंदू समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने दर्शन होणार आहे. तेलंगाणाचे आमदार राजा भैया, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई यांचा विशेष सहभाग असणार आहे.'

भिसे म्हणाले, 'धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.'

घाटे म्हणाले, 'रविवारी (२२ जानेवारी) सकाळी दहा वाजता लाल महाल येथून मोर्चाची सुरूवात होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचेल.

आव्वाज कुणाचा म्हणत कलाकारांचा विजयी जल्लोष

18/1/23

महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर करंडक नाटिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पुणे : बाल कलाकारांच्या आव्वाज कुणाचा, हिप हिप हुर्ये अन्‌‍ भारत माता की जय अशा जल्लोषाने भरत नाट्य मंदिर आज
दणाणले. निमित्त होते ते महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर आंतर शालेय नाटिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे.

भालबा केळकर करंडक नाटिका स्पर्धेत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या वन्दे मातरम्‌‍' नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावित भालबा करंडक जिंकला आहे. भारतीय विद्याभवनाच्या सुलोचना नातू मंदिराने सादर केलेल्या आजीची दंतकथा' या नाटिकेला द्वितीय क्रमांकाचा कृष्णदेव मुळगुंद करंडक तर आकांक्षा बालरंग भूमीच्या काकुचं बाळ' या नाटिकेला तृतीय क्रमांकासाठी राजाभाऊ नातू करंडक मिळाला आहे. नाविन्यूपर्ण व कल्पक सादरीकरणासाठी नानासाहेब शिरगोपीकर करंडक महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, नऱ्हेच्या यज्ञकर्मी' या नाटिकेने पटकाविला आहे. पारितोषिक वितरण समारंभापूर्वी पारितोषिक प्राप्त नाटिकांचे सादरीकरण झाले.

पारितोषिक वितरण डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे यांच्या हस्ते झाले. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज्‌‍चे संचालक मकरंद केळकर, महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, परिक्षक सौरभ पारखे, सुनीता गुणे रंगमंचावर होते.

अभिनय आणि कलागुणांना वाव मिळावा म्हणून मेहतन घेणाऱ्या शिक्षकांचे, मुलांमध्ये कलागुण सातत्याने जागृत ठेवणाऱ्या पालकांचे आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शरद कुंटे म्हणाले, समाजामधील प्रत्येक चांगली गोष्ट टिकविण्यासाठी मोठे कार्य करावे लागते. स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी हे कार्य सातत्याने करीत आहे.

परिक्षकांच्या वतीने बोलताना सौरभ पारखे म्हणाले, तंत्राच्या आहारी न जाता अभिनयावर लक्ष केंद्रीत करावे, मुलांना त्यांच्या वयाच्या अनुषंगाने भूमिका द्याव्यात याचा विचार शिक्षक, लेखक आणि दिग्दर्शकांनी आवर्जून करावा. नाटक करणे म्हणजे व्यक्तीमत्त्व विकास आहे. शारीरिक आणि बौद्धिक विकासही नाटकाच्या माध्यमातून होतो. वाचिक अभिनयाप्रमाणेच कायिक अभिनयासाठी पारितोषिक दिले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मकरंद केळकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाश पारखी म्हणाले, बालनाट्यातील पुरुषोत्तम करंकड म्हणून भालबा केळकर करंडक स्पर्धा ओळखली जाते. बालनाट्य लिहिताना लेखकाने आपण कोणत्या वयोगटासाठी लिखाण करतो आहोत याचे भान ठेवावे.

उपस्थितांचे स्वागत महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर यांनी केले. संस्थेचे सचिव ॲड. राजन ठाकूरदेसाई यांनी निकाल जाहीर केला. सूत्रसंचालन अवंती लोहकरे यांनी तर आभार अभिजित देशपांडे यांनी मानले.

ब्ल्यू ब्रिगेड अल्ट्रा ३३८K" उपक्रमातून निधीसंकलन

18/1/23

पुणे:- ब्रिगेड रनिंग क्लबने एक स्तुत्य असा सामाजिक उपक्रम आयोजित केला आहेअजय देसाईप्रशांत पेठे आणि श्यामल मोंडल हे तीन वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले अवलिया एकत्र येऊन "ब्ल्यू ब्रिगेड अल्ट्रा ३३८K" हा उपक्रम राबविणार आहेतयात ७२ तासात ३३८ किलोमीटर धावण्याचा त्यांचा मानस आहे आणि यातून टाईप  डायबेटीस असणाऱ्या वंचित घटकातील लहान मुलांसाठी मदतनिधी उभारण्यात येणार आहे१८ जानेवारीला या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोणी येथील शिक्षा एज्युकेशन सोसायटीच्या इनोव्हेरा शाळेपासून रामदरा मंदिरापर्यंतचा २५ किमीच्या रस्त्यावर धावून हा उपक्रम पूर्ण केला जाईलतसेच ‘ब्लू ब्रिगेड रनिंग क्लबचे युसूफ देवसवाला आणि सतेज कल्याणी हे दोघे प्रत्येकी १६१ किमी धावतीलमागील अशाच उपक्रमाअंतर्गत मिळालेला . लाख निधी टाईप  डायबेटीस असणाऱ्या वंचित घटकातील लहान मुलांच्या उपचारासाठी कार्यरत असलेल्या नित्याशा फाऊंडेशनला देण्यात आला होतायावर्षीही "ब्ल्यू ब्रिगेड अल्ट्रा ३३८K" या उपक्रमातून जास्तीत जास्त मदतनिधी संकलित करून नित्याशा फाउंडेशनला देण्यात येणार आहेत्यासाठी सर्वांनी सढळ हस्ते आपली मदत https://www.nityaasha.org/make-a-difference/ या वेबसाईटवर जाऊन जमा करावी असे आवाहन उपक्रमातील सर्व धावपटूंनी केले आहे.

मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा सामना करत असलेल्या अजय देसाई यांनी फक्त धावण्यातून आपल्या आजारांवर नियंत्रण मिळवलेयाचा अनुभव आणि ज्ञान इतरांनाही देता यावे यासाठी त्यांनी २०१५ साली ‘ब्लू ब्रिगेड रनिंग क्लबची स्थापना केली१० लोकांपासून सुरू झालेली ही सामाजिक संस्था आता तब्बल ६०० लोकांपर्यंत पोहोचली आहेतसेच पुण्यातील  वेगवेगळ्या स्थळांवर कार्यरत आहे.